• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलाला केबिनबाहेर हुसकावले… पण तो आत आलाच नि डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये घडलं काय?

August 23, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर मारहाणीच्या घटनांनी कल्याण हादरले आहे. नगरसेवकांपासून ते रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रमेश म्हात्रेने केलेली मारहाणीची घटना ताजी असताना अजून असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत डॉक्टरला रुग्णाच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. शास्त्रीनगरनंतर पुन्हा डॉक्टरांवरील हल्ल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप केल्या जात आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजारपणाविषयी माहिती देत असतानाच मुलगा डॉक्टरांवर संतापला आणि थोड्या वेळाने केबिनमध्ये येत त्याने ही मारहाण केली.

आजारपणाबद्दल माहिती, डॉक्टरांना मारहाण

कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना रुग्णाच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. रुग्णाच्या आजाराबाबत समजावत असताना मुलगा विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये संतापला. रुग्णाने मुलाला केबिनबाहेर जाण्यास सांगितले. मात्र काही वेळाने पुन्हा केबिनमध्ये येत त्याने डॉक्टरांना मारहाण केली. घटनेनंतर भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात येत असल्याचे या प्रकारावरून समोर येत आहे. यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

मारहाणीच्या याप्रकारानंतर संबंधित तरुणाविरोधात कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा डॉक्टरांवर हल्ला झाला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची वैद्यकीय क्षेत्रातून मागणी करण्यात येत आहे.

दुसर्‍या एका प्रकरणात डॉक्टरविरोधात गुन्हा

प्रेमसंबंधातून एका तरुणीवर धर्मांतरासाठी आणि निकाह करण्यासाठी दबाव आणल्याच्या गंभीर आरोपात एका डॉक्टरविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी आणि आरोपीची 2020 पासून ओळख होती. कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. त्याचा गैरफायदा घेत त्याने लैंगिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान 16 ऑगस्ट 2025 रोजी काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेऊन तिने दुसरा धर्म स्वीकारल्याचे तिला सांगण्यात आले. पण इतर धर्म स्वीकारण्यास तिने नकार दिल्यावर तिला धमकी देण्यात आली. संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in