
Ashwini Paul Naldurg : राष्ट्रीय दर्जाची कुस्तीपटू असलेल्या अश्विनी पौळ यांनी नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून मुलांसह उडी मारली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात एका मागून एक मोठे अपडेट पुढे येत आहेत. त्यातच अश्विनी या किल्ल्यावर जाताना केक आणि चॉकलेट घेऊन जात होता. मात्र, कर्मचाऱ्याने त्यांना रोखले. किल्ल्यावर केक आणि चॉकलेट घेऊन जाण्यास मनाई असल्याने अश्विनी यांना केकवरती घेऊन जाऊ दिला नाही. त्यांनी तो केक किल्ल्याच्या गेटजवळच कट केला. यासोबतच त्यांच्यासोबत चॉकलेटही होते. नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून पहिले मुलांना फेकले, त्यानंतर स्वतः उडी मारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. किल्ल्यावरील कर्मचाऱ्याला नोंदणी करताना अश्विनी यांनी सांगितले होते की, माझे पती मागून येत आहेत.
त्यातच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येतंय. अश्विनी पौळ यांच्या मृत मुलाच्या तोंडात चॉकलेट असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी किल्ल्यावर जाताना त्यांच्यासोबत चॉकलेट होती. अश्विनी गेल्या काही दिवसांपासून तणावात होत्या. पतीसोबत त्यांचे वाद सुरू होते. मुंबईतील नोकरी सोडून त्या आपल्या माहेरीच मुलांसोबत राहत होत्या.
किल्ल्याच्या बाहेर त्यांनी केक कट केला. यासोबततच त्यांनी एका छोट्या दुकानदाराकडून चॉकलेटही घेतली होती. दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय. मृत अश्विनी यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या पती आणि सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय.
अश्विनी यांच्या वडिलांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून तिला प्रचंड त्रास दिला जात होता. अश्विनी या मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलात नोकरीला होत्या. मात्र, पतीच्या सांगण्यावरून त्यांनी राजीनामा दिला, आणि त्या आपल्या गावी परतल्या. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या मुलांसह माहेरी राहत होत्या. त्यातच त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला. या घटनेने मोठी खळबळ उडाली.
Leave a Reply