• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलगा पुण्याचा राहतो बंगलोरला, पगार 5 लाख, पत्नीचा 3 लाख, पोटगी ऐकून थक्क व्हाल

August 16, 2026 by admin Leave a Comment


एका ३० वर्षांच्या तरुणाने त्याच्या २९ वर्षांच्या पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या दोघा पती-पत्नीला मुलबाळ नाही. दोघेही बंगळुरु येथे उच्चभ्रु वस्तीत रहातात. घराचे EMI देखील दोघे समसमान भरतात. पतीला इन हँड सॅलरी पाच लाख रुपये तर पत्नीला तीन लाख रुपये महिना. घरातील इतर खर्च दोघे मिळून करतात. मात्र, या सुखवस्तू कुटुंबात मिठाचा खडा पडला आहे. आता पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मुलगा मुळचा पुण्याचा असून तो मतभेद वाढल्यानंतर पुण्याला आई-वडीलांकडे जाऊन राहात आहे. तर पत्नी बंगळुरुलाच फ्लॅटमध्ये रहात आहे. तिने पोटगी म्हणून तब्बल सहा कोटी रुपयांची मागणी केली आहे.या केसने पोटगीच्या अवास्तव मागणीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

मुळचा पुणेकर असलेल्य या तरुणाला आता त्याच्या वकीलांनी या प्रकरणात कोर्टाबाहेर हा वाद सोडवण्याचा सल्ला दिला आहे.या दामप्त्याला कोणतेही मुल नाही. दोघेही समान ईएमआय भरत आहेत. दोघांची कमाई देखील चांगली तगडी आहे. पत्नीला देखील तीन लाख पगार असताना तिने सहा कोटींचा पोटगीचा दावा दाखल केला आहे. यात 3 कोटी रुपये स्थायी गुजारा भत्ता, सुमारे 2.5 कोटी रुपये होम लोन पतीने भरुन हे घर पत्नीच्या नावे करणे आणि सुमारे 50 लाख रुपयांचे ज्वेलरी स्वत: जवळ ठेवणे अशा अटी पत्नीने घातल्या आहेत. त्यामुळे पतीने ही मागणी पुरवण्यास असहमती व्यक्त केली आहे. त्याच्या वकीलांनी आता त्यांना contested divorce मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे. पत्नीने किती अन्याय्य मागणी केल्याने पतीने सहमतीने कोर्टाबाहेर तोडगा काढण्याचा निर्णय योग्य आहे का ? असा सवाल समाजमाध्यमावर केला जात आहे.

एवढ्या मोठ्या पोटगीला मंजूरी मिळणार का ?

आता एवढी मोठी रक्कम पोटगी म्हणून स्वत: कमावत्या पत्नीने मागितल्याने आणि दोघांची कमाई चांगली असल्याने आणि शिवाय अपत्य देखील नसल्याने कोर्ट या प्रकरणात पत्नीला ही पोटगी देण्याचा आदेश देणार का ? अशी चर्चा या निमित्ताने सोशल मिडियावर सुरु आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in