• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मुन्नाभाई’ फेम अभिनेत्याच्या कारची पिता-पुत्राला धडक; स्थानिकांशीच घातली हुज्जत, घटनेनंतरचा VIDEO व्हायरल

August 17, 2026 by admin Leave a Comment


‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फॅशन’, ‘देसी बॉइज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता आणि व्हॉइस ओव्हर कलाकार अश्विन मुश्रान एका कार अपघातात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या बापलेकाच्या जोडीला धडक दिल्याचा आरोप अश्विनवर आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मडगावमधील केपेम इथल्या कुसमान इथं घडली. अश्विन रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवत होता, तेव्हा त्याच्या कारची धडक एका दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अश्विन आणि त्याची पत्नी घटनास्थळी जमलेल्या लोकांशी वाद घालताना दिसत आहेत.

अश्विन मुश्रान चुकीच्या दिशेने गाडी चालवत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याच्या गाडीची धडक बसली. या घटनेचा नेमका तपशील अद्याप समोर आला नाही. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन आणि त्याच्या पत्नीने याप्रकरणी दुचाकीस्वारालाच दोष दिला आणि स्थानिकांशी भांडण केलं. घटनास्थळी स्थानिक नेते अमोल काणेकर आणि इतर लोकांनीही त्यांना जाब विचारला. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना काणेकर यांनी दावा केला की, या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून पीडित व्यक्तीच्या हाडाचा तुकडा अश्विन मुश्रानच्या गाडीच्या उजव्या टायरच्या फेंडरमध्ये अडकलेला आढळला. त्यांनी असाही आरोप केला की, स्थानिकांशी वाद झाल्यानंतर अश्विन आणि त्याची पत्नी एका पार्टीला जाण्यासाठी तिथून निघून गेले आणि अपघाताबद्दल माफीदेखील मागितली नाही.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by journalist (@reporters__diary)

स्थानिकांनी घटनास्थळी अश्विनची गाडी थांबवली होती आणि तो परत येऊन माफी मागेपर्यंत गाडी परत देण्यास नकार दिला. काही वेळानंतर अश्विन तिथे परत आला आणि त्याने माफी मागितली. मात्र याप्रकरणी अद्याप त्याने सार्वजनिकरित्या कोणतंही निवेदन दिलेलं नाही. अश्विन मुश्रान याने ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फॅशन’, ‘देसी बॉइज’, ‘मैं तेरा हिरो’, ‘शहजादा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in