• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुकेश अंबानी यांनाही राहावलं नाही; रणवीरच्या ‘धुरंधर’बद्दल म्हणाले, “प्रचंड अपेक्षेनं..”

June 4, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटांनी छप्परफाड कमाई करत इतिहास रचला. या चित्रपटांचं प्रेक्षक-समिक्षकांनी भरभरून कौतुक केलं. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेसुद्धा ‘धुरंधर’चं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. जियो स्टुडिओजच्या यशाबद्दल बोलताना अंबानींनी संपूर्ण इंडस्ट्रीत नवीन मापदंड प्रस्थापित करण्याचं श्रेय ‘धुरंधर’च्या फ्रँचाइजीला दिलं.

काय म्हणाले मुकेश अंबानी?

“जियो स्टुडिओजने सलग तीन वर्षांपर्यंत सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट देऊन अनोखा विक्रम रचला आहे. 2024 मध्ये स्त्री 2, 2025 मध्ये धुरंधर आणि 2026 मध्ये धुरंधर : रिव्हेंज. यावरून आमचं सातत्य आणि नेतृत्त्व सिद्ध होतं. भारतात तर सोडाच पण जगभरात यापूर्वी कधीही धुरंधरसारख्या फ्रँचाइजीची संकल्पना, त्यासाठीचा निधी आणि इतक्या कमी कालावधीत दोन भागांचं शूटिंग केलं गेलं नाही. धुरंधरच्या पहिल्या भागाने आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा विक्रम प्रस्थापिक केला. या चित्रपटाने थिएटर्समध्ये सलग 15 आठवडे चालून एक अभूतपूर्व विक्रम रचला. त्यानंतर प्रचंड अपेक्षेनं दुसरा भाग दाखल झाला आणि त्याने पहिल्या भागाचेही सर्व विक्रम मोडीत काढले”, अशा शब्दांत अंबानी यांनी कौतुक केलं.

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर तब्बल 3100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हे दोन्ही चित्रपट जवळपास 350 कोटी रुपयांच्या एकत्रित बजेटमध्ये बनले आहेत. पहिल्या भागाने जगभरात 1307 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर त्याच्या सीक्वेलने एक पाऊल पुढे टाकत जगभरात 1800 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.

या चित्रपटांमध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्याच्या करिअरमधील हे सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरले आहेत. यामुळे रणवीरची ब्रँड व्हॅल्यू, लोकप्रियतासुद्धा प्रचंड वाढली आहे. रणवीरसोबतच यामध्ये आर. माधवन. अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, राकेश बेदी, सारा अर्जुन, संजय दत्त यांसारख्या कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ‘धुरंधर’चा दुसरा भाग ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in