
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटं आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. परीक्षा पद्धतीमध्ये शिस्त आणण्यासाठी विद्यापीठाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेआधीच केंद्रावर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Leave a Reply