• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित

August 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक प्रसिद्ध आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. या धडक कारवाईत मुंबईतील सात प्रमुख रेस्टॉरंट, क्लब आणि हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. नरिमन पॉईंट येथील नामांकित स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुलाब्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचा परवाना देखील नियमभंगाच्या आरोपावरून रद्द करण्यात आला आहे. एफडीएच्या तपासणीत या दोन्ही ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. या कारवाईत कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्सचा एफएसएसएआय (FSSAI) परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

याशिवाय, मालाड येथील इंजिनिअर्स किचेन्स प्रायव्हेट लिमिटेड, खार येथील खार जिमखाना (नोंदणी प्रमाणपत्र निलंबित), सांताक्रूझ पश्चिम येथील मेसर्स बजरंग स्वीट मार्ट आणि अंधेरी पश्चिम येथील मेसर्स एएसएम हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी सर्विसेस या आस्थापनांचे परवाने देखील एफडीएकडून निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएने स्पष्ट केले आहे की, नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न पुरवले जावे, यासाठी ही मोहीम सुरूच राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला सोडले जाणार नाही, असा इशाराही एफडीएने दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in