• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी त्यातला नव्हेच.. म्हणून फसला सनी देओल, नेटकऱ्यांनी शोधून काढला व्हिडीओ; म्हणाले ‘वाह रे भाऊ..’

August 17, 2026 by admin Leave a Comment


Sunny Deol: इंटरनेटच्या जगात कोणतीच गोष्ट पूर्णपणे डिलीट होत नाही. अभिनेता सनी देओलने नुकताच दावा केला की तो कोट्यवधी रुपयांसाठी पान मसाला किंवा विमल इलायची या ब्रँड्सच्या जाहिराती करण्याच्या बाजूने नाही. सनीने असा दावा करण्यामागचं कारण म्हणजे शाहरुख खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाला/ इलायचीच्या जाहिरातीबद्दल एफडीएनं नोटीस बजावली आहे. यावरून तिघांवर टीका होत असतानाच सनी देओलने आपली बाजू स्पष्ट केली. कोट्यवधी रुपयांसाठी मी कधीच पान मसाल्याची जाहिरात करणार नाही, असं तो एका पॉडकास्टमध्ये म्हणाला. त्याचं हे वक्तव्य व्हायरल होताच आता नेटकऱ्यांनी त्याचा एक जुना व्हिडीओ शोधून काढला आहे.

एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एका युजरने सनी देओलच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनीसोबत रवी किशन आणि विजय राजसुद्धा दिसत आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला सनी दोन तरुणींसोबत एका स्टॉलवर येतो आणि दुकानदाराकडे सर्वांत उत्तम मीठा पान द्यायला सांगतो. तेव्हा दुकानदाराच्या भूमिकेतील रवी किशन त्याला मीठा पानाचं पाकिट देतो. सनी देओलच्या या जुन्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘वाह रे भाऊ’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘थोडा तरी गृहपाठ करा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘इतर सेलिब्रिटी तर वेलची विकत आहेत, याने तर थेट पान मसाला विकला आहे’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

पहा व्हिडीओ-

Wahh re bhadwo @shubhankrmishra @iamsunnydeol https://t.co/LwnVrABBBC pic.twitter.com/hXTExlPQeD

— 𝙇 𝙊 𝙂 𝘼 𝙉 (@SRks_Shubhh1) August 16, 2026

एफडीएची नोटीस

अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/ इलायची’चा प्रचार केल्याबद्दल या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तीन अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना ‘विमल पान मसाला/ इलायची’च्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in