• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी..

July 20, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सफदरचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी काही गंभीर आरोप केले. यासोबतच त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत इतरत्र उपचारासाठी सोनम वांगचुक यांना हलवण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे. यादरम्यानच आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे.  नुकताच सोनम वांगचुक यांनी एक ट्विट करत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यासोबतच त्यांनी काही अटीही ठेवल्या आहेत. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याकरिता 3 अटी ठेवल्या.

त्यात पहिली अट म्हटजे केंद्र सरकारने नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल याची जबाबदारी घ्यावी. यासोबतच त्यांनी म्हटले की, मला आणि अभिजित दिपके यांना जर संसदेपर्यंत जाऊ दिले आणि तिथे पेपरफुटीच्या मुद्द्यात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी माझे आमरण उपोषण मागे घेण्यास तयार आहे.

मला जर माझ्या तब्येतीमुळे संसदेत जाता आले नाही तर सफरगंज रूग्णालयात येऊन वरिष्ठ नेत्यांनी मला आश्वासन द्यावे. सोनम वांगचुक यांना सरकारकडून उचलून नेऊन उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोनम वांगचुक यांना उपचारासाठी नेल्यावर या आंदोलनाची हवा निघेल, असा विश्वास सरकारला होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतानाही आंदोलन सुरूच आहे.

अभिजित दिपके तिथे आहे. मध्यरात्रीपासूनच जंतर मंतरवर हालचालींना वेग आल्याचे बघायला मिळतंय. तेथील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद करण्यात आलीत. यासोबतच परिसरात जॅमर लावण्यात आलीत. सरकार काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय. आता सरकार सोनम वांगचुक यांच्या अटी मान्य करणार का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. जर सरकारने या अटी मान्य केल्या तर सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लीबोल
  • ‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
  • Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
  • Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
  • Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in