
सांगायचं झालं तर, डिसेंबर 2025 मध्ये मुंबईत एपी ढिल्लनचा एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान तारा सुतारियाही स्टेजवर आली होती आणि एपी ढिल्लनने तिला किस केले. या कॉन्सर्टला वीर पहाडियाही उपस्थित होता. परिणामी, असं म्हटलं गेलं की, Kiss कॉन्ट्रोव्हर्सी मुळे तारा आणि वीर यांच्यातील नातं संपलं.
तर मे महिन्यात, एका सूत्राचा हवाला देत 'फ्री प्रेस जर्नल'च्या रिपोर्टनुसार, तारा सुतारियाला वीर बदलायचं होतं आणि तिला सर्वकाही तिच्या इच्छेनुसार हवं होतं, पण दोघांचं नातं अटींशिवाय नव्हतं
सूत्रांनी अभिनेत्रीला 'डॉमिनेटिंग' सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार, तारा हिला तिच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी बदलायच्या होत्या. असं देखील सांगितलं जातं की, वीर याच्या घरातील भिंतींचा रंग देखीली तिला बदलायचा होता आणि घराचं पूर्ण डेकोरेशन तिला हवं तसं करायचं होतं.
असंही म्हटलं जात आहे की. ताराची अशी इच्छा होती की वीरने पूर्णपणे तिच्या मनासारखं बदलावं, वीरच्या मित्रांनी त्याला बदलण्याची काहीच गरज नाही आणि तो जसा आहे तसाच ठीक आहे, असं सांगितलं. तरीही, मित्रांचा विरोध असूनही वीर, तारासाठी स्वतःला बदलायला तयार होता.
तारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षा करत असतात.




Leave a Reply