• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’, अमित ठाकरेंनी खडे बोल सुनावताच भावेश कावरे वठणीवर, म्हणाला काय?

August 16, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील ताडदेव येथील एका घराच्या संदर्भात ‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी डिवचणारी जाहिरात केल्यानंतर भावेश कावरे चांगलाच अडचणीत सापडला. या जाहिरतीमुळे सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याच्याविरोधात संतापाची भावना होती. त्याने ही जाहिरात का केली याचे स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ शेअर केला होता आणि दिलगिरी व्यक्त केली होती. या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी त्याला बोलावून घेतले. त्याला या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांनी त्याचे चांगलेच कान पिळले. त्यानंतर कावरे वठणीवर आला.

अमित ठाकरे यांनी विचारला जाब

तू जे बोललास ते अत्यंत चुकीचे आहे. लोक आता मुंबईतील अडचणीवर बोलायला लागले आहेत. त्यांचं लक्ष त्यावर केंद्रित होत असताना तू असं बोलतोस, तू त्यांना भरकटवतोस असा जाब अमित ठाकरे यांनी भावेशला विचारला. थोड्याशा प्रसिद्धी आणि पैशांसाठी तू उगाच ताण निर्माण केलास. भावेश, तुला माहिती तू, चांगलं काम करत होता, तेव्हा मीच तुला बोलावलं होतं. मग तुला कुठं कोणत्या गोष्टी सोडायला हव्यात हे तुला कळयाल हवं, असे खडे बोल अमित ठाकरे यांनी भावेश कावरे याला सुनावले. आता तू कव्हर अप करायला रील्स तयार करतोय. पण ही चूक तू अगोदरच होऊ द्यायची नव्हतीस. कुठे कुणाच्या धर्मावर, जातीवर जायचं नाही. अशा मुलांचा वापर काही लोक भरकटवण्यासाठी करतात. आमची रस्त्यावर मोठी ताकद आहे. तू आज सगळ्यांची माफी माग असे अमित ठाकरे यांनी त्याला सुनावले.

मी मुंबईकरांची माफी मागतो

अमित ठाकरे यांनी खडसावल्यानंतर या वादग्रस्त जाहिरातीविषयी भावेश कावरे याने माध्यमांसमोर येत माफीनामा दिला. मी मुंबईकरांची माफी मागतो. कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो. भावेश कावरे. मी मुंबईकरांची आणि मनसे, अमित ठाकरे यांची माफी मागतो. मला पुढे वाद वाढवायचा नाही. मी मराठी माणसाला घर देत आहे. त्यांना घर देत राहणार. ही जाहिरात केल्यानंतर इतका वाद होईल असं काही वाटलं नव्हतं. पण तरीही भावना दुखावल्या असतील तर मी मुंबईकरांची माफी मागतो असे भावेश म्हणाला.

तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

भावेश कावरे याने आज अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी भावेशवर संताप व्यक्त केला. भावेश याने अमित ठाकरे आणि मराठी लोकांची यावेळी माफी मागितली. मात्र अमित ठाकरे आणि भावेश कावरे याचा तीन वर्षे जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात भावेश कावरे आला असतानाचा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाला कंटेन्ट क्रिएटरचा सत्कार मनसेकडून करण्यात आला होता. यावेळचा अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा व्हिडिओ वायरल होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in