• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला, 3 तरुण आपसात भिडले, एकाला गच्चीवरुन खाली फेकलं

August 19, 2026 by admin Leave a Comment


कोणते वाद कधी आणि कोणत्या थराला पोहोतील काहीही सांगता येत नाही. रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपलं नियंत्रण गमावते आणि त्या काही मिनीटांच्या रागातून मोठी घटना घडते. जी अत्यंत भयानक असते. आता देखील असंच काही घडलं आहे.  महिलेसोबतचा शुटिंगचा वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला. ही घटना नाशिक याठिकाणी घडली आहे.  ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस घटनेची कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबत केलेल्या शुटिंगचा वाद मनात धरत तीन तरुणांमधील वाद विकोपास गेला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल संजय सरकटे असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्याचं वय 30 वर्ष आहे. नाशिक येथील विल्होळी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

समोर  येत असलेल्या माहितीनुसार, राहुल सरकटे आणि वैभव मेंगळ यांची झटापट झाली. घराच्या गच्चीवर संशयितांनी तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. गाडेकर, खरे आणि राहुल यांच्यावर संशयितांकडून जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील राहुल याला गच्चीवरून खाली फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे.  अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगळ यांच्यासह तिसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस आता प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

वादाची सुरुवात नेमकी कशामुळे झाली. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे? तरुणाला फेकून देण्याची वेळ का आली? अशा सर्व पैलूंचा विचार करत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in