• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिला कार्यकर्त्यांनी भर सभेत सुनेत्रा पवार यांना I LOVE YOU वहिनी म्हटलं, उपमुख्यमंत्री हसल्या, अन् नंतर म्हणाल्या…

August 17, 2026 by admin Leave a Comment


पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा उद्योगनी अ‍ॅपचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र यावेळी अ‍ॅपपेक्षाही चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील एका भावनिक संवादाची. भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार चांगल्याच भाऊक झाल्याचं पहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, भाषणावेळी कार्यकर्ते देखील चांगलेच भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी वहिनी आय लव्ह यू अशी हाक दिली. त्यावर सुनेत्रा पवार हसल्या अन् त्यांनी देखील आय लव्ह यू टू असं म्हटलं.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

‘माझ्या, तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे. ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणामध्ये आपण सर्वच पोरके झालो. पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पहाते, तेव्हा मला रडायचं नाही तर लढायचं बळ मिळतं. असं सुनेत्रा पवार यांनी म्हणताच कार्यकर्त्यांमधून वहिनी आय लव्ह यू, असा आवाज आला. त्यावर सुनेत्रा पवार थोड्या हसल्या आणि म्हणाल्या आय लव्ह यू टू,’ दादांना आश्रू कधीच आवडत नसत असंही यावेळी सुनेत्रा पवार यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांना देखील कार्यकर्त्यांनी दादा आय लव्ह यू म्हटलं होतं. त्यावर अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी करताना म्हटलं होतं की आता मला घरी गेल्यावर बायको जोड्यानेच हाणल . माझ्या एवढं प्रेम तु आधी तुझ्या बायकोवर कर आणि मग माझ्यावर कर असा मिश्लिक सल्ला अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in