• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाविकास आघाडीत धुसफूस! पवार गटासोबत युती नकोच; सपकाळ यांच्याकडे थेट मागणी; पुण्यात काय घडलं?

August 18, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहेत. अशातच आता पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटासोबत यापुढे कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी मागणी केली आहे.  यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी खडकवासला मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भीमराव कोकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना सपकाळ यांच्यासमोर मांडत निवेदन दिले. यावेळी कोकरे यांनी शरद पवार यांच्या पक्षासोबत यापुढे युती नको अशी भूमिका मांडली.

शरद पवार यांच्या पक्षासोबत युती नको

शरद पवार गटाच्या सातत्याने बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे नुकसान होत असल्याचा आरोप कोकरे यांनी केला. त्यामुळे आगामी काळात शरद पवार गटासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय युती करू नये, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पवार गटाच्या धरसोड राजकीय भूमिकांचा फायदा भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांना होत असल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. काँग्रेसने आता अधिक ठामपणे स्वबळावर जनतेसमोर जाण्याची गरज असल्याचेही कोकरे यांनी सांगितले.

खडकवासल्यातून काँग्रेसचाच उमेदवार हवा

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ‘जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे. जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे आणि तेच कार्यकर्त्यांच्या मनात आहे. खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे असं सपकाळ यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार

खडकवासला मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मागणीची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईल, असे आश्वासन सपकाळ यांनी दिले. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शरद पवार गटातील संभाव्य आघाडीबाबत स्थानिक पातळीवर मतभेद वाढण्याची शक्यता आहे. खडकवासला काँग्रेसच्या या भूमिकेमुळे पुण्यातील आगामी राजकीय समीकरणांनाही वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in