
पुणे महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी आपल्या प्रभाग दोनमधील १२ कोटी रुपयांचा विकास निधी राजकीय सूडबुद्धीने शून्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. डिंगरे यांच्या मते, मागील काळात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या चौकशीसाठी आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी अनुमोदन दिले होते. याच कारणामुळे आता त्यांचा विकास निधी कापण्यात आल्याचे ते सांगतात. त्यांच्यासाठी हा एक शॉक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निधीत समाज मंदिर, बुद्ध विहार, महिलांसाठी योगा हॉल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि तरुणांसाठी क्रीडांगणे यांसारख्या नियोजित जनोपयोगी कामांचा समावेश होता. राज्यात आणि केंद्रात युती असली तरी पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही विकासकामांमध्ये राजकारण आणू नये, असं अजित पवारांचा नेहमी म्हणायचे. असं त्यांनी अधोरेखित केलं. या प्रकरणी ते वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply