• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘महाकाव्य श्री रामायण कथा’च्या टीझरमध्ये असा ब्लंडर की नेटकऱ्यांचा पारा चढला; नेमकं काय चुकलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे नितेश तिवारी यांचा 4000 कोटी रुपयांचा ‘रामाणय’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, तर दुसरीकडे ‘महाकाव्य श्री रामाणय कथा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत आहे. हा टीझर प्रदर्शित होताच त्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. सीतेच्या भूमिकेतील अंजलीवर नेटकरी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. नेटकऱ्यांनी ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या चित्रपटाच्या टीझरमधील सर्वांत मोठी चूक हेरली आहे. निर्माते इतका मोठा ब्लंडर करूच कसा शकतात, असं नेटकरी विचारत आहेत.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये श्रीराम आणि सीतेच्या स्वयंवरापासून वनवासापर्यंतचे अनेक महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. राम आणि सीता यांचं स्वयंवर, त्यानंतर सुरू होणारा 14 वर्षांचा वनवास, सीतेचं रावणाकडून अपहरण.. अशा विविध घटनांची झलक यात पहायला मिळतेय. मात्र हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर केवळ कलाकारांच्या निवडीमुळेच नव्हे तर एका धार्मिक संदर्भामुळेही चर्चा सुरू झाली आहे. काहींनी टीझरमध्ये ‘कृष्णाय वासुदेवाय हरये’ या मंत्राचा वापर केल्याकडे लक्ष वेधलं. रामायणातील कालखंड आणि भगवान श्रीकृष्णाचा काळ वेगळा असल्याने हा मंत्र या कथानकात कसा आला, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पहा टीझर-

अंजली अरोराच्या सीतेच्या भूमिकेवरही सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर काहींनी टीझरची तुलना यापूर्वी आलेल्या रामायणावर आधारित चित्रपटांशी केली आहे. सोशल मीडियावर अंजलीची प्रतिमा एक बोल्ड इन्फ्लुएन्सर म्हणून आहे. तिचे विविध डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिले आहेत, ज्यामध्ये ती तोकडे कपडे घालून नाचताना दिसते. त्यामुळे अशा व्यक्तीला सीतेची भूमिका दिल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. ‘हिला सीता बनवणं हा खूप मोठा अपमान आहे’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. इन्स्टाग्रामवर ठुमके लावणारी मुलगी सीता मातेची भूमिका साकारू शकत नाही, असं एकाने लिहिलंय. तर ‘घोर कलयुगाची सुरुवात झाली आहे. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. अंजली तिच्या एका एमएमएसमुळेही चर्चेत आली होती. त्यामुळे तिने सीतेची भूमिका साकारू नये, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

या चित्रपटात ‘हिरोपंती’सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या देव शर्माने भगवान श्रीराम यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in