• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मला बंदुक हातात घ्यायची होती’, 17 व्या वर्षी व्हायचं होतं नक्षलवादी… दक्षिणेतील सुपरस्टारची मोठी कबुली, समजूत कोणी घातली?

June 11, 2026 by admin Leave a Comment


Pavan Kalyan Statements: दक्षिण चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आणि आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या एक विधानाने सर्वांचे कान टवकारले. तरुणवयात पवन कल्याण यांच्यासमोर करिअरचे विविध मार्ग होते. त्यावेळी पवन कल्याण यांना वेगळ्याच वाटेवर जायचे होते. पण त्यांचा भाऊ चिरंजीवी यांनी त्याला योग्य मार्ग दाखवला. त्याला काही तरी चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पवन कल्याण यांनी ANI च्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, त्यांनी नक्षलींच्या काही बैठकांनाही हजेरी लावली होती. पण त्यांनी हा मार्ग सोडला.

पवन कल्याण यांना 17 व्या वर्षीच व्हायचं होतं नक्षलवादी

पवन कल्याण यांनी तो काळ कसा होता, याचे माहिती दिली. 80 च्या दशकात त्यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद, श्रीलंकेत सुरू असलेले लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम LTTE चे कारनामे, जर्मनीतील अशांती, खालिस्तान चळवळ याची माहिती मिळत होती. त्याचवेळी त्यांच्या मनात नक्षली होण्याचा विचार आला.

#WATCH | Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan says, “In my late teens, I wanted to pick up the gun and become a Naxalite. That’s when my brother pushed me into a more constructive path…”

Watch Full Episode Here: https://t.co/jDkN9XZ5tE pic.twitter.com/nETuCBRdlY

— ANI (@ANI) June 10, 2026

मला बंदुक हाती घ्यायची होती

पवन कल्याण यांनी त्याकाळातील मनोदशेवर प्रकाश टाकला. मी नक्षलवाद्यांसोबत जाण्याचा विचार केला होता. तो तरुणपणीचा काळ होता. त्यावेळी मी बंदुक हाती घेण्याच्या विचारात होतो. तेव्हा माझ्या भावाने मला थांबवले आणि काहीतरी चांगलं करण्याचे प्रोत्साहन दिले. मला भावाने विचारले की तुला हे मूर्खपणाचे विचार आले कुठून? मला अन्यायाविरोधात लढायचं आहे, असं उत्तर मी दिलं. ते चिंतेत होते. वयाच्या
17 ते 21 या काळात या घटना घडल्या. हाच तो काळ असतो, जेव्हा तुम्ही अशा कामात जाऊ शकता, असे पवन कल्याण यांनी सांगितले.

चिरंजीवी यांनी फटकारले

पवन कल्याण यांनी सांगितले की, नेमक्या वेळी मोठा भाऊ चिरंजीवी यांनी माझे कान धरले. मला त्यांनी एकच सवाल केला. “जर तुझा भाऊ चिरंजीवी नसता, जर तुझ्यावर कुटुंबाची जबाबदारी नसती. जर तुझ्या नोकरीवर, कष्टाच्या कमाईवर कोणी अवलंबून असतं, तर तेव्हा तू असं केलं असतं का?” त्यांच्या या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकलो नाही. मी शांत राहिलो. त्यानंतर मी अध्यात्मिक झालो आणि अभिनयाचे प्रशिक्षण सुरू केल्याचे पवन कल्याण यांनी सांगितले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in