
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून होता. शिवसेना शिंदे गट नाशिक आणि रायगड या दोन्ही जागांसाठी आग्रही होती. शेवटी रायगडचे पालकमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. मंत्री भरत गोगावले मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा दावा करत होते. अनेकदा यावरून वादही रंगला. आदिती तटकरे देखील रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होत्या. शेवटी शिवसेना शिंदे गटाकडे रायगडचे पालकमंत्रीपद गेले. भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला.
नुकताच भरत गोगावले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. गोगावले यांना विचारण्यात आले की, विरोधक तुम्हाला कोट कधी मिळणार बोलत होते काय उत्तर? यावर गोगावले यांनी म्हटले की, ते त्यांचं काम करत होते, आम्ही आमचं; मला खात्री होती कोट मिळणार… कोट कधी मिळणार म्हणणाऱ्यांना उत्तर मिळालं. कालपासून पुन्हा कोट घालायला सुरुवात केली. भगवानच्या घरात उशीर आहे, अंधेरा नाही, माझा विश्वास खरा ठरला.
धनुष्यबाण चिन्हाबाबत बोलताना भरत गोगावले यांनी म्हटले की, त्यांना आता कल्पना आली असेल की धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळणार नाही, ते आमच्याकडेच राहणार आहे… कालपर्यंत ते म्हणत होते की चिन्ह आम्हाला मिळणार, नाव आम्हाला मिळणार, पक्ष आम्हाला मिळणार. आता अचानक चिन्ह गोठवण्याची भाषा सुरू झाली आहे.. याचा अर्थ त्यांना निकालाची दिशा लक्षात आली आहे, म्हणूनच चिन्ह गोठवण्याची मागणी केली जात आहे.
पालकमंत्रीपदाची जबाबदारबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, मुंबई-गोवा महामार्गाचं काम हे आमचं पहिलं प्राधान्य असेल. रायगडच्या विकासासाठी पायाभूत सुविधांना विशेष महत्त्व देणार. रोजगार आणि स्थानिकांना कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. जिल्ह्यातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन, जे शक्य आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार.
Leave a Reply