
जेथे व्यवसाय करतो तेथील भाषा शिकली पाहिजे. जो ज्या राज्यात राहातो त्या राज्याची भाषा आली पाहिजे. पण सरकारने देखील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हिंदी भाषिकांना थोडी आणखीन मुदत वाढवून दिली पाहिजे. परंतू एक अजूनही गैर मराठी भाषिक समाज येथे राहातो आहे, परंतू तेथे कदाचित कोणाची चालत नसावी असाही टोला केंद्रिय वस्र मंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांना लगावला आहे. नवीमुंबई खारघर येथे एका कार्यक्रमास आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राज्यातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी ग्राहकांशी मराठीत बोलावे यासाठी त्यांना मराठीचे धडे देण्याची मोहिम दोन महिन्यांपासून परिवहन खात्याने सुरु केली आहे. या मोहिमेसाठी राज्य मराठी भाषा संवर्धन विभाग, कोकण साहित्य परिषद आणि परिवहन विभागाने मराठी भाषेचे वर्ग सुरु केले होते. त्याला वर्गासाठी दीड लाखाहून अधिक हिंदी भाषिक चालकांनी हजेरी लावली होती. त्यांपैकी १७०० चालक मराठी भाषेच्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाले होते. त्यांच्यासाठी पुन्हा उजळणी वर्ग सुरु करण्यात आले आहेत. आता मराठी भाषा शिकण्यावरुन हिंदी भाषिक नेत्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत.
केंद्रिय वस्र मंत्री गिरीराज सिंह यांनी खारखर नवी मुंबईत ते एका कार्यक्रमास पाहुणे म्हणून आले असताना मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी हिंदी भाषिकांनी अवश्य मराठी शिकावी, त्या – त्या राज्यात तेथील स्थानिक भाषा आलीच पाहिजे. परंतू राज्य सरकारने मराठी भाषा शिकण्याची मुदत थोडी आणखीन वाढवून दिली पाहिजे असे गिरीराज सिंह यावेळी म्हणाले.
अमराठी चालकांवरील कारवाईची स्थिती
auto and taxi driver marathi action
Leave a Reply