• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता

August 17, 2026 by admin Leave a Comment


माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं. शंभर टक्के पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलावलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचंय. पुढचे जीआर कसे काढायचे, मागच्या काढलेल्यांत काय सुधारणा करायचे का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता की अभ्यासक हमेशा विरोधात बोलत्यात. हे हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या, त्या ऐकून घेतल्या नाही, जीआर चुकीचा आहे तर दुरुस्त करा, असा असा करा हे आम्हाला सांगायचं होतं पण जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाहीत, बोलविलं नाही. म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढं दिसलं. यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाहीये. यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात, मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वयक फक्त यांना बोलायचंय, हे सिद्ध झालेलंय. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही. कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची आहे का समाजाची आहे, हे आता मराठा समाजासमोर उघड झालंय. मराठे सरळ म्हणणार आहेत आता, तुम्हाला बोलावलं होतं, आले नाहीत. जे आलेत त्यांना जे विचारलं त्याचे उत्तरं का नाही दिले? आणि मग तिकडं मीडियात बोलायचं आणि इथं समोरासमोर किती चान्स होता. समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचा आहे तर मला उघडं पाडायचं मीडियापुढंच. आमच्यापासून लांब जायचं शंभर पन्नास किलोमीटर वरून मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोकं पण आहेत. मी जर दोषी आहे तर मला मीडियासमोर उघडं पाडायचं. आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषणं केले त्यामध्ये तुमच्या मागण्या काही मान्य झालेल्या आहेत काही बाकी आहेत. पुढे कुठल्या मागण्यांना घेऊन कुठली कुठली प्रमुख मागणी असेल जी घेऊन तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत. आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी एक वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्या आहेत जाणूनबुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीयेत. नोंदी कमी करायच्यात आणि म्हणायचं फक्त एवढ्याच सापडल्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठे आम्ही सरकार पाडीनार. जर 58 लाख नोंदीतली एक बी नोंदी कमी केल्या तर.

मी हे खूप तळमळीनं, तळतळाटीने सांगतो. एक तर बावनकुळेंनी इतका तळतळाट घेतलाय मराठ्याचा, शिरसाटांनी आणि त्यांनी. गोरगरिबाचं वाटोळं करून. त्याच्यात तो भुमरे बी आहे. याचिका करायला लावतो, कुठं नाटकं करायला लावतो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतोय. आता यायला लागलेत फोटो बी त्याचे. कसं कसं करून घेतोय. कसा कसा घरी जातो, कसं कसं सांगतो, ते बी यायला लागलंय त्याचं आता बाहेर. झालं, एकदा होईल, पुढं कुठं जाणार आहेस? म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. हे सरकारने पहिल्यांदी समजून घ्या. आणखीनही दुरावा, दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेत त्यांच्या व्हॅलिडिट्या पाहिजेत. तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्यात. हा माझा अचानक एका आता ध्यानात आले. ह्या चार-तीन दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केलंय. ज्या व्हॅलिडिट्या झाल्यात ना त्या पुन्हा तपासणीला घेतल्यात जाणून. नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्यांच्याच घेतल्यात विखे? नीट वागा बरं का तुम्ही मराठ्यांसंगं. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिडिट्या आतापर्यंत झाल्यात, ज्यांच्या व्हॅलिडिट्या पुन्हा सुनावणीला लावल्यात तुम्ही, फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात, एससी, एसटी, ओबीसींच्या? जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का. फडणवीस साहेब, तुमचे मंत्री माजुरड्यासारखे करायलेत. तुम्ही लई दूषित वातावरण असं वागू नका. तुमच्याविषयी इतकी खदखद आहे सरकारविषयी, विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित-मुस्लिमात, मायक्रो ओबीसीत, आदिवासीत, इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका, विनाकारण असे त्रास देऊ नका. कवा सत्ता हातातून निसटून जाईल, माहित पण नाही होणार आहे. मी मला 58 लाख नोंदीच्या प्रमाणपत्रा, व्हॅलिडिट्या पाहिजेत. सात हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढलाय त्याप्रमाणे प्रमाणपत्र आणि त्या व्हॅलिडिट्या कशा देणार, दाखल केलेल्या आहेत, त्या व्हॅलिडिट्या पाहिजेत. विखे पाटलांना तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जालन्याला सहा व्हॅलिडिट्या दाखल केलेल्या आहेत. ते गावडे का गावंडे कुणीतरी आहेत त्यांच्याकडं. का दिल्या नाहीत? आत्तापर्यंत. त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेले आहेत. मला सातारा संस्थान, कोल्हापूर



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in