• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ममता बॅनर्जी यांच्या केंद्रीय राजकारणात परतण्याच्या स्वप्नांना सुरुंग, युसूफ पठाण यांचा राजीनामा देण्यास नकार

June 5, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगाल येथे झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमुल काँग्रेसमधील ( TMC ) पडझड सुरुच आहे. रोज कोणी तरी पक्ष सोडत आहे किंवा राजीनामा देत आहे. ८० पैकी ५८ टीएमसी आमदारांनी बंडखोरी करीत नवा विरोधी पक्ष नेता निवडला आहे. या दरम्यान आता ममता बॅनर्जी दिल्लीतील राजकारणात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत जायचे आहे. सध्याच्या स्थितीनुसार ममता यांना लोकसभेत जाण्यासाठी आपल्या एखाद्या खासदाराकडून राजीनामा घ्यावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीएमसीचे बहरामपूर येथील खासदार युसूफ पठाण यांना ममता बॅनर्जीसाठी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. परंतू त्यांनी नकार दिल्याचे समजते आहे.

लोकसभेत जाऊन संसदीय राजकारणात टीकून राहण्याचा ममता बॅनर्जी यांचा मार्ग सोपा राहिलेला नाही. ममता यांच्यासाठी युसूफ पठाण यांनी बहरामपूर जागेवरुन राजीनामा दिला तर तेथे पोट निवडणूक करुन ममता यांना तेथून निवडून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र यासाठी युसूप पठाण याने स्पष्ट नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बहरामपूर येथे ५० टक्क्यांहून अधिक मुस्लील लोकसंख्या आहे, त्यामुळे तेथून त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांच्या साठी सर्वात सुरक्षित सीट असू शकते असे ममतांचे म्हणणे आहे. परंतू हा मार्ग सोपा नाही. कारण काँग्रेसचे माजी खासदार अधीर रंजन चौधरी देखील येथे अनेक वर्षे खासदार होते. त्यांना गेल्या लोकसभा निवडणूकीत युसूफ पठाण यांनी हरवले होते.

युसूफ पठाण यांनी राजीनामा दिला तरी ममतांसाठी ही निवडणूक जिंकणे सोपे राहिलेले नाही. कारण अधीर रंजन चौधरी देखील काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरले तर जुने जाणते नेते असल्याने त्यांना याचा मोठा फायदा मिळेल. मात्र, आता तर मुळात युसूफ पठाण यांनी राजीनाम्या नकार दिला आहे. जोपर्यंत ममता बॅनर्जी कोणा दुसऱ्या खासदाराला राजीनामा देण्यास तयार करत नाहीत तोपर्यंत त्यांचे लोकसभेत पोहचणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेत टीएमसीचे २० खासदार पक्ष सोडण्याची तयारी करत आहेत.

फिरहाद हकीम यांचा कोलकाताच्या महापौर पदाचा राजीनामा

तृणमूल काँग्रेसला एक आणखी झटका बसला आहे. टीएमसीचे वरिष्ठ नेते फिरहाद हकीम यांनी शुक्रवारी कोलकाता महानगर पालिकेच्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. हकीम यांनी म्हटले आहे की आपण व्यवस्थितपणे कार्य करू शकत नसल्यामुळे हा राजीनामा देत आहोत. त्यांनी म्हटले की पार्टी प्रमुख ममता बॅनर्जी यांची परवानगी मिळाल्यानंतर मी ताठ मानेने राजीनामा दिला आहे असे म्हटले आहे.राज्याचे माजी मंत्री आणि पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यापैकी एक असलेल्या हकीम यांनी राजीनामा दिल्याने टीएससीला धक्का बसला आहे. महानगर पालिकेचे प्रमुख म्हणून साडे सात वर्षांच्या कार्यकाळाविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कोलकाता शहरास काही आवाहानात्मक परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…
  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
  • मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in