
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे देण्याची मागणी करत, गरज पडल्यास सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, ओबीसी समाज ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं ओबीसी नेते हरिभाऊ तायवाडे यांनी म्हटलं आहे.
सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसी आरक्षणाला 0.01 टक्केही धक्का लागू नये, अशी भूमिका तायवाडे यांनी मांडली आहे. ओबीसी आरक्षणाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply