• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंत्रीपद मिळणार का? ओमराजे निंबाळकर हसत हसत म्हणाले… त्या दोन शब्दांची राज्यात चर्चा..

August 19, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात 6 खासदारांनी प्रवेश केला. या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आहे. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी वडिलांच्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा याकरिताच शिंदे गटात प्रवेश ओमराजे निंबाळकर यांनी केल्याचे सांगितले गेले. पण ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात केसचा निकाल लागला. पुराव्या अभावी आरोपींची निर्दाेष सुटका करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यात ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांची धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

या बैठकीत ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मोठे भाष्य केले. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी जे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेत. त्यांच्यासाठी, त्यांच्या मतदार संघात असलेले कामे ते सत्तेचा वापर करून शासन दरबारी मांडून ते कामे करून घेण्याच्या दिशेने जे करणे आवश्यक आहे, ते निश्चितच आम्ही करू.

ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाची ताकद वाढवायची आहे, यासोबतच लोकांच्या कामाला महत्व द्यायचे असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. यादरम्यान मंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न ओमराजे निंबाळकर यांना विचारण्यात आला. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी हसत हसतनंतर सांगतो असे म्हणाले.  यासोबतच उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेतल्या, त्यावेळी त्यांनी धाराशिवमध्येही सभा घेतली.

यावेळी उद्धव ठाकरे हे ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना दिसले. मात्र, आता त्यांनी धाराशिवमधील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणार नसल्याचे जाहीर केले. हा एक मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची सेना सोडल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोवर्सची संख्या कमी झाली. लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात अनफॉलो केले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in