• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भीषण अपघात, विमान हेलिकॉप्टरला धडकलं, विमानाचे हवेतच तुकडे-तुकडे

August 21, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे, अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला होता, 12 जून 2025 रोजी झालेल्या या अपघातामध्ये 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे देशात त्यानंतर देखील काही विमान अपघाताच्या घटना घडल्या. देशाबाहेर देखील विमानाचे अपघात सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच एक विमान हे हवेत उडत असताना अचानक तीनशे फूट खाली आल्याची घटना घडली होती, या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. दरम्यान पुन्हा एकदा अशाच एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे. हेलकॉप्टर विमानाला धडकून भीषण अपघात झाला आहे.

पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइलमध्ये धावपट्टीजवळ हा अपघात घडला आहे. सेसना 150 नावाचं विमान पोलिसांच्या बेल 407 हेलिकॉप्टरला धडकलं, या भीषण अपघातामध्ये विमानातील पायलटचा मृत्यू झाला आहे, तर हेलिकॉप्टरमध्ये असलेले पोलीस या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. पेनसिल्व्हेनियाचे पोलीस कमिश्नर लेफ्टनंट कर्नल जॉर्ज बिवेन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार सेसना 150 नावाचं हे विमान अचानक हेलिकॉप्टरच्या दिशेनं वळलं, त्यानंतर विमानावरील कंट्रोल सुटून भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, अपघातानंतर विमानाचे तुकडे-तुकडे झाले. या विमानामध्ये पायलट सोडता कोणीही प्रवासी नव्हते. मात्र या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दुसरीकडे या अपघातातून हेलिकॉप्टरमध्ये असलेले पोलीस थोडक्यात बचावले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. विमानाला धडकून जेव्हा हेलिकॉप्टर खाली कोसळलं तेव्हा हे दोन पायलट त्यामध्ये अडकले होते. त्यांना खिकडी फोडून बाहेर काढण्यात आलं, हे पोलीस ट्रेनिंग घेत होते, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. विमान आणि या हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाल्याचं बोललं जात आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हेलिकॉप्टर विमानाला धडक्यानंतर विमानाचे तुकडे झाले आहेत. यावरून हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज येतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in