• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत पाकिस्तान यांच्यात तणाव, तरीही 150 पाकिस्तानी नववधू भारतात दाखल, बॉर्डर बंद असतानाही..

August 23, 2026 by admin Leave a Comment


पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिक तणावात आली. भारताने सिंधू जल करारही स्थगित केला. सर्व सेवा बंद केल्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केली. पाकिस्तानी नागरिक आता थेट भारतात येऊ शकत नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्तान सीमा बंद असतानाही पाकिस्तानातून भारतात तब्बल 150 नववधू दाखल झाल्या. भारतीय मुलांशी त्यांनी लग्न केले. तिसऱ्या देशांमार्फत प्रवास करून पाकिस्तानातील 150 हून अधिक नववधू भारतात दाखल झाल्या. थेट पाकिस्तान भारत सेवा पूर्णपणे बंद आहे. ज्यामुळे तिसऱ्या देशातून या नववधू भारतात दाखल झाल्या. मस्कत, कोलंबो, ढाका, दुबई आणि कतारमार्गे विमान प्रवास करत या नववधू भारतात आल्यात.

भारतात आल्यानंतर नागपूर, जोधपूर, अहमदाबाद, रायपूर, पुणे आणि भोपाळ यांसारख्या शहरांमध्ये त्यांनी प्रवेश केल्याची माहिती मिळतंय. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आली. त्यामुळे भारतातील आपल्या नियोजित वरांशी विवाह करण्यासाठी पाकिस्तानातील अनेक तरुणींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला होता. लग्न तर करायचे होते, पण बॉर्डर बंद असल्याने येणेही भारतात शक्य नव्हते.

मग काय या पाकिस्तानी नववधूंनी तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. या विवाहांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष सवलत दिली. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेले भारत-पाकिस्तानातील विवाह अखेर पार पडू शकले. सामान्य परिस्थितीत भारतीय व्हिसा असलेले पाकिस्तानी नागरिक वाघा-अटारीमार्गे भारतात येऊ शकतात. मात्र, सीमा बंद असल्याने यावेळी त्यांना तिसऱ्या देशातून विमानाने भारतात यावे लागले.

एप्रिल ते जूनदरम्यान सुमारे 150 पाकिस्तानी नववधू भारतात आल्या असून, त्यांच्यासोबत 450  नातेवाईकही आले. नातेवाईकांना ठराविक कालावधीत पाकिस्तानात परतण्याची अट घालण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे भारतात विवाहासाठी येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. आणखी 300 जण अद्याप भारतात येऊन विवाह करण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळतंय. नागपूरमध्येही पाकिस्तानातून आलेल्या काही नववधूंचे विवाह भारतीय वरांसोबत पार पडले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in