• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताला अडचणीत आणणाऱ्या पाकिस्तान, चीनला ट्रम्प यांचा मोठा धक्का; संपूर्ण जगासमोर उघडं पाडलं, अमेरिकेचा मोठा निर्णय

June 6, 2026 by admin Leave a Comment


संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर संघटनांना संयुक्त राष्ट्र संघाच्या 1267 प्रतिबंध सूचीमध्ये टाकावं अशी मागणी करणारा पाकिस्तान आणि चीनचा प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळून लावला आहे. अमेरिकेनं पाकिस्तान आणि चीनला स्पष्ट शब्दात सुनावलं आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी विरोधात असा कोणताही ठोस पुरावा नाहीये की ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल त्यांचा संबंध अल -कायदा किंवा इसीस सारख्या दहशतवादी संघटनांशी आहे. सध्या अमेरिकेचे आणि पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत, मात्र मैत्रीपूर्ण संबंध असताना देखील अमेरिकेनं यावेळी पाकिस्तानला चांगलंच अडचणीत आणलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय पाकिस्तानच्या आर्मीचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या रणनीतीला मोठा झटका मानला जात आहे. आसीम मुनीर यांच्याकडून वारंवार बलूच संघटनांचा भारताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. जर बलूच संघटनांचा भारताशी संबंध जोडला गेला तर तो एक आंतरराष्ट्रीय मुद्दा होऊ शकतो, आणि तो पाकिस्तानमधील अंतर्गत मुद्दा आहे, असं देखील कोणी म्हणणार नाही, ही त्या पाठीमागची रणनीती आहे. परंतु अमेरिकेच्या एका निर्णयामुळे आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तान-चीनचा काय प्लान होता?

इकोनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तान आणि चीनकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्या साथीदार असलेल्या इतर संघटनांना 1267 प्रतिबंध सूचीमध्ये टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या सुचीमध्ये अल कायदा, इसीस अशा खरतनाक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. परंतु या प्रस्तावाला अमेरिकेकडून टेक्निकल होल्ड लावण्यात आला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे कोणत्याही दहशतवादी संघटनेसोबत संबंध आहेत, याचा कोणताही पुरावा नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे भारताला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही भारताचं समर्थन असलेली दहशतवादी संघटना आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न होत होता, मात्र आता अमेरिकेनं चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे, पाकिस्तानच्या मनसुब्यांबर पाणी फिरलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in