• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतात हाहाकार! थेट भारतातील संवेदनशिल माहिती पाकिस्तानात, मोठी खळबळ, मुख्य सीसीटीव्ही..

April 13, 2026 by admin Leave a Comment


ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तानने ज्याचा विचारही केला नाही, असा दणका भारताने दिला. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आपली ट्रॅकिंग क्षमता पुन्हा एकदा अपडेट केली. नुकताच याबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने आयएसआयने भारतीय सेना, बीएएसएफ यांच्या पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमधील सैन्य तैनातील. लॉजिस्टिक्स अशा महत्वाच्या ठिकाणांचे लाईव्ह फुटेज मिळवण्याची तयारी केली. काही ठिकाणचे थेटपणे त्यांना फुटेज देखील जात होते. यासाठी, आयएसआयने एक नवीन पद्धत अवलंबली आहे. सौरऊर्जेवर चालणारे चीनी इसीक्लाउड सीसीटीव्ही कॅमेरे वापरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सीसीटीव्ही संबंधित मुद्दा गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बीएसएफच्या जी ब्रांचने केंद्रीय यंत्रणांकडे उपस्थित केला होता.

पाकिस्तानात असलेल्या डीप एसेटने भारताला याबाबत अलर्ट केले होते. पाकिस्तान भारतात सीसीटीव्ही प्लॅनवर काम करत आहे. दिल्ली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्पेशन सेल अभियान सुरू केले. यादरम्यान पंजाब आणि दिल्लीतून या प्रकरणात 11 जणांना ताब्यात घेतले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी सिम कार्ड असलेले सौर ऊर्जेवर चालणारे 9 सीसीटीव्ही कॅमेरे जप्त केले.

ज्यामध्ये एसआयएम कार्ड होते. या कॅमेऱ्यांना अत्यंत संवेदनशिल ठिकाणी लावण्यात आले होते. जेणे करून शत्रूंना आरामात लाईव्ह फुटेज मिळू शकले असते. यादरम्यानच्या छापेमारी वेळी पोलिसांना 4 पिस्तूल 3 पीएक्स 5 आणि 1 देशी सापडले. यासोबतच 24 जिवंत काडतुसेही सापडली. ज्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आले ते पाकिस्तानमध्ये असलेल्या काहींच्या संपर्कात असल्याचीही माहिती पुढे येतंय. एकप्रकारचे ठरवून हेरगिरी मॉड्येल चालवले जात होते.

अटक केलेल्या 11 लोकांपैकी 8 जण पंजाबचे तर 3 जण दिल्लीचे होते. सर्वात अगोदर गाझियाबाद पोलिसांनी याविरोधात अभियान राबवले, त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे येताना दिसली. दिल्ली एनसीआरमध्ये सक्रिय पाकिस्तानच्या आयएसआयच्या नेटवर्कचीही भांडाफोड करण्यात आली. 9 सोलर सिम-सक्षम कॅमेरे आधीपासूनच थेट फुटेज आयएसआयला पाठवत होते. हे कॅमेरे कपूरथला, जालंधर, पटियाला, मोगा यांसारख्या ठिकाणी बसवण्यात आले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra Temperature Today : राज्यावर दुहेरी संकट, मोठा इशारा, 24 तासात..
  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in