• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतातील या रेल्वे स्टेशनवरून थेट विदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन, एका देशात जाण्यास बंदी

July 1, 2026 by admin Leave a Comment


भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. सर्व सामन्य नागरिक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. स्वस्त, सुरक्षित असल्याने नागरिकांची रेल्वेने प्रवासाला पसंती असते. देशांतर्गत प्रवासासोबत भारतीय रेल्वे परदेशातही जाते. परदेशात म्हणजे देशाच्या सीमेला लागून असलेल्या देशात.. यात नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान हे देश आहेत.

भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जातात. भारताच्या मधुबनी जिल्ह्यातील शेवटचं स्टेशन आहे. येथून नेपाळच्या जनकपूरला जाण्यासाठी ट्रेन मिळते. नेपाळ स्टेशन भारतीय स्टेशनच्या सीमाभिंतीच्या बाहेर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी एक उड्डाणपूल आहे. या स्टेशनवर चेक-इन केल्यानंतर, प्रवासी थेट नेपाळला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चढू शकतात.

बिहार-नेपाळ सीमेजवळ असलेले रक्सौल जंक्शन, नेपाळला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक प्रमुख थांबा मानले जाते. हे नेपाळचे मुख्य प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या विविध भागांना नेपाळशी जोडणाऱ्या रेल्वेगाड्या येथून सुटतात.

पश्चिम बंगालमधील पेट्रापोल रेल्वे स्टेशन हे भारत-बांग्लादेश सीमेवरील एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे. ब्रिटिश काळात बांधलेले हे स्टेशन, बांगलादेशातील खुलना शहराशी ब्रॉडगेज मार्गाने जोडलेले आहे. येथून बंधन एक्सप्रेस धावते. मात्र, प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे.

पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथे असलेले राधिकापूर रेल्वे स्टेशन, भारत-बांगलादेश रेल्वे वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे. दोन्ही देशांदरम्यान मालगाड्या आणि प्रवासी गाड्या धावतात. हे स्टेशन एक सीमा तपासणी नाका म्हणूनही काम करते. हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. चिलाहटी स्टेशनमार्गे दोन्ही देश जोडलेले आहेत. भारतातून ढाक्याला येणाऱ्या रेल्वेगाड्या याच मार्गाने येतात आणि लोक व्यापार व प्रवासासाठी याचा वापर करतात.

अटारी हे भारत-पाकिस्तान रेल्वे नेटवर्कवरील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे स्थानक आहे. पूर्वी या मार्गावर भारतातील अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत समझौता एक्सप्रेस धावत असे. हे स्थानक भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ असून पाकिस्तानात जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. पण आता भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्यामुळे ही ट्रेन आता बंद आहे. (सर्व फोटो: TV9 नेटकवर्क हिंदीवरून)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in