• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट कारवाई, भारताने घेतला मोठा बदला..

August 20, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमच तणाव राहिला. त्यातच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव अधिक वाढला. आता पाकिस्तानने असे काही केले, ज्याला भारताने थेट उत्तर दिले. नवी दिल्ली येथील पाकिस्तान हाय कमिशनच्या बाहेर काही अनधिकृत बांधकाम तयार करण्यात आले होते. भारताने त्यावर बुलडोजर चालवला आहे. पाकिस्तान मिशनच्या व्हिजा सेक्शनजवळ हाय कमिशनबाहेर अतिक्रमण करण्यात आले होते, संबंधित एजन्सींनी ते अतिक्रम काढून टाकले. WION च्या रिपोर्टनुसार, दिल्ली झालेल्या कारवाई अगोदर पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय हाय कमिशनच्या बाहेर मोठी कारवाई केली होती. त्याला उत्तर देण्यासाठीच भारताकडून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जातंय.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय हाय कमिशनच्या बाहेर लावलेल्या पार्किंग पोल हटवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही वर्षांपासून तणाव प्रचंड आहे. त्यात आत अशाप्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशन बाहेर असलेल्या व्हिसा सेक्शनजवळ ठरलेल्या सीमेबाहेर बांधकाम तयार करण्यात आले.

त्या सर्व बांधकामावर बुलडोजर चालण्यात आला. आता वाद सीमेपर्यंतच मर्यादित राहिली नाही तर हाय कमिशनपर्यंत पोहोचला. नवी दिल्लीत करण्यात आलेल्या कारवाई अगोदर पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय हाय कमिशनच्या बाहेरील पार्किंग टोल काढले. त्यानंतर आता भारतानेही मोठी कारवाई केली. भारताने थेट मोठे अतिक्रमण काढत पाकिस्तानला धक्का दिला. थेट उत्तर भारताकडून पाकिस्तानला देण्यात आले.

पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले. भारताने सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेतला. सिंधू जल करार भारताने स्थगित केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला. जागतिक पातळीवरून भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तानकडून केले जात आहे. यासोबतच काही धमक्याही दिल्या जात आहेत. हे पाणी भारताने बंद केल्याने पाकिस्तानमध्ये स्थिती गंभीर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला पाणी देणार नसल्याची भूमिका भारताची आहे. यासोबतच वीज प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट भारताने केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in