• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपा कार्यकारिणीत मोठे फेरबदल, युपी ते महाराष्ट्र, 5 मोठे मुद्दे!

August 17, 2026 by admin Leave a Comment


भाजपा कार्यकारिणीत मोठे फेरबदल, युपी ते महाराष्ट्र, 5 मोठे मुद्दे!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पक्षाने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महासचिव आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांसह विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा केली आहे. यात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आणि इतरही महत्त्वाच्या राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. भाजपच्या या निर्णयातील 5 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.

1. महाराष्ट्रातून 5 चेहऱ्यांना संधी

भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून 5 चेहऱ्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कायम ठेवण्यात आलं आहे, तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.

2. यूपी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नियुक्त्या

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक 6 पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.उत्तर प्रदेशातून तारिक मन्सूर आणि रेखा वर्मा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, स्मृती इराणी आणि हरीश द्विवेदी यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी, तर डॉ. भोला सिंह आणि संगीता यादव यांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अमरपाल मौर्य यांच्याकडे ओबीसी मोर्चाची, तर कुंवर बासित अली यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

3. नव्या टीममध्ये तरुणांना प्राधान्य

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन स्वतः 46 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या केंद्रीय टीममध्ये तरुण चेहऱ्यांना विशेष प्राधान्य दिले आहे. 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 6 सदस्यांना, 40 ते 49 वयोगटातील 15 सदस्यांना आणि 50 ते 59 वयोगटातील 21 सदस्यांना राष्ट्रीय टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

4. महिला नेत्यांवरही मोठी जबाबदारी

नितीन नबीन यांच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. पक्षाच्या संविधानानुसार संघटनेत 33 टक्के महिला आरक्षणाची तरतूद आहे आणि नव्या टीमच्या गठनात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. भाजपच्या नव्या टीममधील एकूण 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी 6 महिला आहेत. त्यामुळे हे प्रमाण 33 टक्क्यांपेक्षा जास्त असून जवळपास 50 टक्के आहे. याशिवाय महिला नेत्या म्हणून स्मृती इराणी यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चार महिलांना राष्ट्रीय सचिव म्हणून स्थान देण्यात आले आहे.

5. 2 मुस्लिम चेहऱ्यांना संधी

भाजपच्या नवीन टीममध्ये दोन मुस्लिम चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये तारिक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कुंवर बासित अली यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे भाजपने अल्पसंख्याक समाजालाही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. तारिक मन्सूर हे पसमांदा मुस्लिम समाजातून येतात, तर कुंवर बासित अली हे राजपूत मुस्लिम आहेत. दोन्ही नेते उत्तर प्रदेशातील असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in