
BJP National Executive Committe : गेल्या काही दिवसांत भाजपात अनेक घडामोडी घडत आहेत. केंद्रातील मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. पडद्यामागे तशा हालचाली केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता राजधानी दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजपाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. या फेरबदलात महाराष्ट्रातील भाजपाच्या चार नेत्यांन मोठी संधी देण्यात आली आहे. त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात ही नवी कार्यकारिणी काम करेल. आताच्या घोषणेनुसार माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागलेली आहे. मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री व केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोषाध्यक्षपदी कायम असतील.सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रिती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.
स्मृती इराणी यांचे कमबॅक
मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष असतील. दुसरीकडे भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचं एका प्रकारे कमबॅक झालं आहे. त्या कार्यकारिणीत सरचिटणीस असतील.
Leave a Reply