• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला, बॅनर फाडले; राजकीय वर्तुळात खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment


मध्य प्रदेशच्या दातियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यकर्ते हे चंद्रशेखर आझाद यांच्या सभेतून परतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रचार वाहनांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर देखील फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशच्या दातियामधील जिगना पोलीस स्टेशनच्या उदगवा गावात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रचार वाहनाचं पोस्टर देखील फाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दातियामध्ये विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची विधानसभेची सदस्यता रद्द झाली. फसवणूक प्रकारणात शिक्षा मिळाल्यानंतर त्यांचं पद रद्द झालं. आता या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान 30 जुलै 2026 रोजी होणार आहे. तर मतमोजणी 3 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे.

दातियामध्ये भाजपकडून आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली. नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसकडून घनश्याम सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात भाजपच्या नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता. भाजपला या जागेवर विजय मिळवायचा आहे. तर भाजपनेही या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

भाजप-काँग्रेस पक्षात जोरदार चुरस 

ही पोटनिवडणूक हायप्रोफाइल मानली जात आहे. दोन्ही प्रमुख पक्षाने या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नरोत्तम मिश्रा यांना बाजूला सारून भाजपने मोठा डाव टाकला आहे. काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची देखील रॅली झाली.   यंदा काँग्रेससाठी देखील कडवं आव्हान असणार आहे. आता मतदार कोणाला मतदान करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच पोटनिवडणुकीच्या निकालाची अनेकांना प्रतिक्षा असणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in