
पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघात राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का बसणार असून, कसब्यातील शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शिंदे गटाला कसब्यात मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. ऐकीकडे शिंदे गटाचं इनकमिंग सुरू असताना अचानक मोठी घडमोड समोर आली आहे. काही काळापुर्वी अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता. ज्यामुळे राज्याचं राजकारण चागलंच ढवळुन निघालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी किराड यांच्यासह शिंदे गटातील अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये सामील होतील. या प्रवेशामुळे कसब्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींवर कसब्यातील प्रमुख नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला काय कोणाची मदत लागत नाही. एकटा धंगेकर सगळ्यांना बस्सं आहे,” असे ठामपणे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भविष्याचा आणि त्यांच्या राजकीय वाटचालीचा विचार करून ते हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या राजकारणात शक्यतो कोणाला बरोबर घेत नाही, असेही धंगेकर यांनी नमूद केले. या प्रवेशामुळे कसब्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
Leave a Reply