• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ… राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

July 27, 2026 by admin Leave a Comment


राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत असताना, तर काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र आहे.

पुढील काही तासांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar prices : साखरेच्या भावात प्रचंड वाढ, किंमतीविरोधात ते एक वाक्य पडलं भारी…, सरकारी अधिकाऱ्याचं थेट तडकाफडकी निलंबन
  • खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in