• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बेस्ट बसच्या अपघातांचे सत्र सुरूच, 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, अपघाताचे भयावह फोटो समोर

July 20, 2026 by admin Leave a Comment


सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी BESTच्या 501 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसचा वाहक आणि चालक गंभीर जखमी आहेत.

मुंबईच्या मानखुर्द येथे सायन पनवेल हायवेवर आज सकाळी एक मोठा अपघात झाला. BEST ची बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. हा अपघात आज सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी विश्वकर्मा हॉस्पिटलसमोर झाला. अपघात BEST ची रूट क्रमांक 501 ची बस डिव्हायडरला धडकली.

राजावाडी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या गंभीर अपघात 3 जण जखमी झाले. त्यापैकी 65 वर्षीय भास्कर रावसाहेब पांडे यांना मृत घोषित करण्यात आले असून ते अपघाताच्या वेळी डिव्हायडरजवळ उभे होते.

बसचे वाहक वैभव वाघमारे आणि चालक बनवारी शर्मा यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचं नाव श्रीराम प्रसाद शर्मा आणि बस वाहक वैभव वाघमारे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण सतत होणाऱ्या अपघातांचं नेमकं कारण काय? याचा शोध घेणं फार गरजेचं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिलेली, त्यामुळे आम्हाला…सुप्रिया सुळेंच्या विषयावरुन उमेश पाटलांवर सडकून टीका
  • जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक… आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
  • मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी
  • Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
  • मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in