• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बुध ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश, 22 ऑगस्टपासून या 6 राशींच नशीब फळफळणार, कोणती आहे तुमची रास

August 22, 2026 by admin Leave a Comment


ग्रह बदलांचा परिणाम हा राशींवर होत असतो. ग्रह बदलले की, त्याचे चांगले वाईट परिणाम 12 राशीवर होत असतात. आता बुध ग्रहाचे सिंह राशीतील संक्रमण फार महत्त्वाचं ठरणार आहे. याचा फायदा 6 राशींना होणार आहे. सांगायचं झालं तर, ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. चंद्र ग्रहानंतर, बुध असा ग्रह आहे जो सर्वात कमी वेळात आपली राशी बदलू शकतो. सध्या, बुध कर्क राशीत आहे. 22 ऑगस्ट रोजी, बुध सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह 7 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत राहणार आहे. या गोचरामुळे, जिथे बुध आणि सूर्य एकत्र येतात, बुधादित्य राजयोग निर्माण होईल.

बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल आणि प्रगती होऊ शकतात. यामुळे प्रामुख्याने आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता वाढेल. बुध ग्रहाच्या गोचराचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात दिसून येईल. पण सहा राशींना भाग्य लाभेल. तर जाणून घ्या कोणत्या आहेत, त्या सहा राशी

मिथुन : हे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा चांगला काळ आहे. हा काळ त्यांच्यासाठी व्यवसाय, शिक्षण, लेखन इत्यादी क्षेत्रांमध्ये चांगले दिवस आणि प्रगती घेऊन येईल. कामासंबंधित प्रवासातून लाभ मिळेल.

सिंह : या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये बळकट होतील. तुमच्या बोलण्यात सकारात्मक बदल होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याला आणि मतांना आदर व महत्त्व प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या कामात आणि करिअरमध्ये प्रगती कराल. या काळात विद्यार्थी मोठे यश मिळवतील.

कन्या : बुध कन्या राशीच्या व्यक्तींच्या प्रत्येक प्रकल्पात यश मिळवून देईल. कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड वाढेल. त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक यात्राही केल्या जातील.

तूळ : या राशींना चांगला आर्थिक लाभ होईल आणि नवीन मैत्रीमुळे व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील. जे एकत्र व्यवसाय करतील त्यांना अनपेक्षित नफा मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळवून देणारे नवीन करार मिळतील.

धनु : राजकारण्यांना परदेश प्रवासाची संधी मिळेल. न्यायालयीन खटले संपतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल किंवा नोकरी करायची असेल, तर या काळात तुम्हाला संधीही मिळेल.

कुंभ : योग या राशीच्या व्यावसायिकांसाठी हे शुभ राहील. जे संयुक्तपणे व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळेल. वाटाघाटींमधून तुम्हाला अनेक नवीन करार मिळतील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवन चांगलं राहील. आर्थिक स्थिरता वाढेल. व्यवसायात नफा होईल. कायदेशीर बाबींमध्येही अनुकूल निकाल मिळण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in