• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

April 23, 2026 by admin Leave a Comment


आज बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती, तिथे देखील आज पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसने देखील आपला उमेदवार दिला होता. काँग्रेसच्या वतीने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला. मात्र काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आज या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

राहुरी मतदारसंघात काय चित्र?  

भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार आहेत.  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यामध्ये प्रमुख लढत असणार आहे.  एकूण 374 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होणार असून, राहुरी मतदारसंघात 3 लाख 33 हजार 543 इतकी  मतदारांची संख्या आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट! रोहित सिंगला अटक होणार? जय पवार यांचे मोठे संकेत
  • मोठी बातमी! इराण हादरलं, युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेकडून थेट 100 फायटर जेट, 17 युद्धनौका मैदानात
  • हात-पाय आकडलेले, सर्व शरीर निळं पडलेलं, 30 वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू, तीन तासात काय घडलं?
  • इतिहासाचा अपमान का? ‘राजा शिवाजी’मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर
  • क्रिकेट जगतात मोठी खळबळ, सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटू पकडली, आधी चॅट नंतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in