• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बापरे! पोटात निघाला चक्क 3 किलोचा दगड, फोटो पाहून धक्काच बसेल, थक्क करणारी घटना समोर!

August 19, 2026 by admin Leave a Comment


एका 55 वर्षीय वृद्धाच्या पोटातून डॉक्टरांनी थोडा थोडका नाही तर 3.1 किलो वजनाचा मुतखडा बाहेर काढला आहे. या खड्याचा आकार 17 सेंटीमीटर इतका आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया एखाद्या मोठ्या रुग्णालयात, हॉस्पिटलमध्ये घडलेली नाही. तर एका सरकारी रुग्णालयात हा मुतखडा रुग्णाच्या पोटातून बाहेर काढण्यात आला. हा खडा शहामृगाचे अंडे अथवा एखाद्या नवजात बालकाप्रमाणेच दिसतो. डॉक्टरांच्या दाव्यानुसार हा जगातील आतापर्यंत काढण्यात आलेला सर्वात मोठा मुतखडा आहे. शस्त्रक्रियेद्वारे तो काढण्यात आला आणि त्याची नोंद घेण्यात आली आहे. अर्थात अजून या दाव्याचा पडताळा झालेला नाही. पण हा खडा पाहूनच तो किती मोठा आहे हे समोर येत आहे.

पोटात कळा, लघवीला त्रास, मग केली शस्त्रक्रिया

पोटात कळा उठल्याने आणि लघवीला त्रास होत असल्याने हा रुग्ण श्रीलंकेतील सर्वसामान्य रुग्णालयात दाखल झाला. त्याला लघवी व्यवस्थित होत नसल्याचे कारण समोर आले. त्याची तपासणी केली असता, मूत्राशयात भला मोठा खनिजांचा दगड असल्याचे समोर आले होते. त्रिनकोमाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. प्रगलाधन बालकृष्णन यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया पार पडली. बीबीसी सिंहली या साईटशी बोलताना डॉ. बालकृष्णन यांनी मोठा दावा केला. त्यानुसार, आतापर्यंत शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आलेला हा सर्वात मोठा मुतखडा आहे. जो शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला.

वजन 3 किलो आणि आकार 17 सेंटिमीटर

त्रिनकोमाली जिल्हा सामान्य रुग्णालयात या 55 वर्षीय व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पोटातून खनिजं साचून तयार झालेला 3.1 किलो वजनी आणि 17 सेंटिमीटर आकाराचा मुतखडा काढण्यात आला. शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खडा असल्याचा दावा युरोलॉजिस्ट डॉ. प्रगलाधन बालकृष्णन यांनी केला. अर्थात या दाव्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. या दाव्याचा पडताळा घेण्यात आलेला नाही.

हा दगड शहामृगाच्या अंड्या इतका मोठा आहे अथवा एखाद्या नवजात बालकांप्रमाणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वैद्यकीय शास्त्रातील या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या दाव्याच्या जगभर चर्चा होत आहे. शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय तज्ज्ञांची चमू दिमतीला होती. त्यांनी सुद्धा इतका मोठा मुतखडा पाहिला नसल्याचा दावा केला आहे.

मुतखडा म्हणजे काय?

मूत्राशयातील खडा म्हणजे लघवीतील खनिजांच्या कठीण गुठळ्या म्हणता येतील. मूत्राशय पूर्णपणे मोकळे होत नाही. तेव्हा लघवीतील क्षार हे एकत्र येऊन खड्यांमध्ये रुपांतरीत होतात. लहान खडे लघवीवाटे बाहेर पडतात. पण मोठे खडे काही केल्या हटत नाहीत. ते मूत्राशय नलिकेत बाधा आणतात. त्यामुळे लघवी साफ आणि पूर्ण होत नाही. हे मोठे खड्डे वाढल्यास मग मोठा त्रास होतो. पोट दुखते. तीव्र वेदना होतात. लघवी करताना जळजळ होते. अनेकदा लघवीला जाण्याची इच्छा होते. लघवीतून रक्त पडते. लघवी गढूळ होते. लघवीचा प्रवाह अडकतो. ही लक्षणं मूतखड्याविषयीची आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in