• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाथरूमची दुर्गंधी ठरतीये त्रासदायक, यावर स्वयंपाकघरातील या वस्तू पुरेशा, जाणून घ्या खास टिप्स

September 4, 2026 by admin Leave a Comment


सफाई करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बाथरुममध्ये येत असलेली दुर्गंधी कशी दूर करता येईल? सांगायचं झालं तर, पूर्वीच्या काळी, बाथरुम घराबाहेर असायची. त्यामुळे, काही प्रमाणात, दुर्गंधी घरात पसरत नव्हती. पण आता आपण पाहायला गेलं तर, बहुतेक घरांमध्ये बाथरुम घराच्या आतच असतात. त्यामुळे, जर ती स्वच्छ ठेवली नाहीत, तर दुर्गंधी येऊ लागते. पण तुम्ही बाथरुम नेहमी स्वच्छ ठेवले तरीही, अनेकदा तीव्र दुर्गंधी येतेच. रसायनांनी भरलेले एअर फ्रेशनर विकत घेऊन पैसे वाया घालवण्याऐवजी, आपल्या स्वयंपाकघरातील काही सामान्य वस्तू वापरून तुम्ही दुर्गंधी दूर करू शकता… काही घरगुती उपाय करत तुम्ही ही समस्या दूर करु शकता.

बेकिंग सोडा: बाथरूमच्या एका कोपऱ्यात एका लहान वाटीत किंवा कपात थोडा बेकिंग सोडा ठेवा. तो नैसर्गिकरित्या हवेतील ओलावा आणि दुर्गंधी शोषून घेईल, ज्यामुळे हवा ताजी राहील आणि बाथरुममधील दुर्गंधी दूर होईल

व्हिनेगर: एका स्प्रे बॉटलमध्ये समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर मिसळा आणि ते फरशा व गटारांवर फवारा. यामुळे जीवाणू नष्ट होण्यास आणि डाग व दुर्गंधी दूर होण्यास खूप मदत होते.

लिंबू आणि मीठ: एक लिंबू अर्धे कापून त्यावर थोडे सैंधव मीठ शिंपडा आणि धुण्यापूर्वी ते सिंक व नळांवर चोळा. यामुळे दुर्गंधी दूर होते आणि ताजेपणाचा सुगंध येतो; तसेच सिंकवरील डागही निघून जातात.

लवंग आणि वेलची: थोड्या लवंगा आणि वेलची ठेचून, त्या एका लहान कापडी पिशवीत ठेवा आणि बाथरूममध्ये टांगून ठेवा. त्यामुळे नैसर्गिक सुगंध येतो आणि माश्या दूर राहतात.

लक्षात ठेवण्यासारख्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,  हवा खेळती राहील याची खात्री करा.  बाथरूममधील एक्झॉस्ट फॅन व्यवस्थित चालू ठेवा किंवा खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे दुर्गंधी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. बाथरूममधील गटारांमध्येच प्रामुख्याने जीवाणू आणि दुर्गंधी निर्माण होते. आठवड्यातून एकदा गरम पाण्यासोबत त्यात व्हिनेगर टाकणे ही एक चांगली कल्पना आहे.

 

 

 

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनिया गांधी यांची आत्मकथा अखेर हार्परकॉलिन्स प्रकाशित करणार, या तारखेला होणार रिलीज
  • Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
  • वैभव सूर्यवंशीबाबत बीसीसीआयचा पुढचा प्लान काय? सचिवांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत सांगितलं की…
  • मुस्लिम व्यक्ती जवळून गेली तरी उलटी… वादग्रस्त बोलणारा स्वतंत्र भारद्वाज कोण? सीजेपीचा नंबर एकचा शत्रू कसा बनला?
  • 49 मध्ये डिमार्टमध्ये मिळतंय ही जबरदस्त वस्तू, ग्राहकांची गर्दीच गर्दी, सकाळीच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in