• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बांगलादेश नरमला, थेट तोंडावर पडताच बदलले सूर, अखेर भारताच्या..

August 18, 2026 by admin Leave a Comment


बांगलादेश सध्या इतका खतरनाक अडकला आहे की, ना तो भारतासोबत पंगे घेऊ शकतो ना भारतासोबत चांगले नाते ठेऊ शकतो. तीस्ता जल करार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना करायचा आहे. भारताच्या हातात हा संपूर्ण करार आहे. यासोबतच आता त्यांनी दिल्लीला विनंती केली की, त्यांनी बांगलादेशाच्या हिताचा विचार करावा. बांगलादेशचे जल संसाधन मंत्री शाहिदुद्दीन चाैधरी यांनी पोर्टल टीबीएस न्यूज हॉट नेटला म्हटले की, शेजारी देश मित्र देश आहे. त्यांनी हा विचार केला पाहिजे की, जसे त्यांचे हित आहे, तसे आमचेही हित आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या हिताचा विचार केला पाहिजे. आम्हाला कधीच वाटत नाही की, त्यांचे आणि आमचे नाते खराब व्हावे. तीस्ता नदीची समस्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दूर व्हावी, ही त्यांची इच्छा आहे.

जर हा करार भारताने व्यवस्थित केला नाही तर मोठे संकट बांगलादेशात येऊ शकते. यादरम्यान त्यांनी पुढे म्हटले की, उत्तर बांगलादेशच्या पाच ते सहा जिल्ह्यांना याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत, हे लोक गेल्या कित्येक वर्षांपासून नदीच्या पाण्याची समस्या आणि अन्य समस्यांना सामोरे जात आहेत. जर आम्हाला यात अपयश आले तर त्या क्षेत्रातील कुटुंबियांना मोठे नुकसान सहन करावे लागेल.

त्यांच्या समस्येत मोठी वाढ होईल. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा करार हवा आहे. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिल्याने भारत आणि बांगलादेशचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. मात्र, भारतासोबत जल करार करायचा असल्याने बांगलादेशाकडे काही गत्येंतर नाही. त्यामुळे पुन्हा बांगलादेशला आपली मैत्री आठवली आहे.

काही दिवसांपूर्वीच बांगलादेशाने आपल्या लष्कर अधिकाऱ्यांना सरावासाठी पाकिस्तानमध्ये पाठवले. यासोबतच काही गोष्टींमध्ये बांगलादेश भारताविरोधात भूमिका घेत आहे. आता करार कोणत्याही परिस्थितीमध्ये करावा लागणार असल्याने पुन्हा भारताबाबतची त्यांची भाषा पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळतंय. शेख हसीना पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याची तूफान चर्चा ही रंगतान दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in