• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बांगलादेशमधील एका हिंदू कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी दार उघडताच थरकाप उडाला

August 23, 2026 by admin Leave a Comment


Bangaladeshi Hindu: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्य संशयास्पद परिस्थितीत मृत आढळले आहेत. यामध्ये एका निवृत्त शालेय शिक्षकासह त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. शनिवारी रात्री एका कुलूपबंद घरात चौघांचेही मृतदेह आढळले. पोलीस, सीआयडी आणि गुप्तचर शाखेने तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तींची ओळख गणपती चक्रवर्ती (65), त्यांची पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50), मुलगी आगामी चक्रवर्ती प्रथी (23) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (12) अशी पटली आहे. गणपती हे रंगपूर जिल्हा शाळेत शिक्षक होते आणि गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते होमिओपॅथीचा व्यवसायही करत होते.

गुरुवारपासून कुटुंबाचा संपर्क तुटला…

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रीतिलता यांची धाकटी बहीण पूजा चक्रवर्ती यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्याशी शेवटचे बोलणे केले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री कुटुंबातील चौघांचेही मोबाईल फोन बंद झाले. शनिवारी रात्री रंगपूरच्या दासपाडा भागातील त्यांच्या घरी कुटुंबीय पोहोचले. मुख्य दरवाजाला कुलूप होते आणि घरातील सर्व दिवे बंद होते. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घरात प्रवेश करून चौघांचे मृतदेह बाहेर काढले. चौघांचेही मृतदेह घरातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळले.

रंगपूर मेट्रोपॉलिटन सीआयडी अधिकारी सुबीर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती यांचा मृतदेह छतावर, त्यांच्या पत्नी आणि मुलीचे मृतदेह जिन्याजवळ, तर त्यांचा 12 वर्षांचा मुलगा प्रियम याचा मृतदेह पलंगाखाली आढळला. कुटुंबीयांनी सांगितले की, कुटुंबाला कोणी आणि का लक्ष्य केले हे त्यांना माहीत नाही. गणपती यांची भाची सोमा चक्रवर्ती यांनी सांगितले की, त्यांच्या काकांचे कोणाशीही वाद किंवा वैर नव्हते. कुटुंबाने दासपाडा येथे नवीन घर बांधले होते आणि ते तिथेच राहत होते. गणपती यांची मुलगी आगामी हिने यावर्षी इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती. त्यांचा 12 वर्षांचा मुलगा, प्रियम, इयत्ता पाचवीत शिकत होता.

पोलिसांसह सीआयडीचाही तपासात हस्तक्षेप

रंगपूर मेट्रोपॉलिटन कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नाझमुल कादर यांच्या म्हणण्यानुसार, सीआयडी आणि गुप्तचर शाखाही पोलिसांसोबत या प्रकरणाचा तपास करत आहेत. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. या चौघांचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला, तसेच त्यामागे काय हेतू होता, हे पोलीस सध्या निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम अद्याप उघड झालेला नाही. पोलीस या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in