
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध आणि दूषित पाण्याची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीलबंद बॉटलमध्ये दूषित पाणी आढळल्याचा दावा ग्राहकांकडून करण्यात आला असून, संबंधित बॉटलवर एक्सपायरी डेट नसल्याचाही आरोप आहे.
शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Leave a Reply