• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार? शिवसेनेला ग्राऊंड लेव्हलवर कसा होईल फायदा, जाणून घ्या

April 29, 2026 by admin Leave a Comment


अमरावती ब्रेकिंग: बच्चू कडूंच्या ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाला मोठी कलाटणी? काही तासांत होणार फैसला!

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत आक्रमक आणि जनसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू आज आपल्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गेल्या ३० वर्षांपासून स्वाभिमानी राजकारण करणाऱ्या बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

आज दुपारी १२ वाजता बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या निर्णयाचे पडसाद आगामी विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडू यांना शिवसेनेकडून एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. प्रहार पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व संपवून तो पूर्णपणे शिवसेनेत विलीन करावा, अशी ही अट असल्याचे बोललं जात आहे. जर हा निर्णय झाला, तर अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहेत.

शिवसेनेला काय फायदा?

१. विदर्भात आक्रमक नेतृत्वाची प्राप्ती: शिवसेनेला विदर्भासह राज्यभरात एक असा चेहरा मिळेल ज्याच्याकडे थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची क्षमता असेल. बच्चू कडूंच्या आक्रमकतेमुळे पक्षाची प्रतिमा अधिक प्रबळ होईल.

२. विदर्भात सध्या शिंदे गटाकडे असा कोणताही मोठा नेता नाही, ज्याची संपूर्ण विभागात लोकप्रियता आहे. बच्चू कडू ही उणीव भरून काढू शकतात.

३. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि थेट सरपंच निवडीच्या निवडणुका आहेत. ग्रामीण भागात प्रहारचे जाळे मजबूत असल्याने याचा थेट फायदा शिवसेनेला जागा जिंकण्यासाठी होईल.

४. अमरावतीचा जुना गड पुन्हा मिळवणे: अमरावती हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिवसेनेची पकड ढीली झाली आहे. बच्चू कडूंच्या प्रवेशाने अमरावतीत शिवसेनेचे सुवर्णदिवस परत येऊ शकतात.

५. गेल्या अडीच दशकांपासून बच्चू कडू यांनी प्रहार संघटना घराघरांत पोहोचवली आहे. हे सर्व अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्ते आता शिवसैनिक म्हणून काम करतील, ज्यामुळे संघटनेचे बळ दुपटीने वाढेल.

६. तळागाळातील प्रश्नांची जाण: शेतकरी, शेतमजूर आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी मोठी कामे केली आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि वैशिष्ट्याचा फायदा शिवसेनेला आपली जनमत वाढवण्यासाठी होईल.

७. वक्तृत्व आणि जनसंपर्क: बच्चू कडू यांची स्पष्टवक्ती आणि आक्रमक भाषणशैली मतदारांना आकर्षित करते. यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे वळू शकतो.

८. संघटनात्मक मजबुती: प्रहारचे गाव आणि तहसील स्तरावर मजबूत नेटवर्क आहे. हे नेटवर्क शिवसेनेच्या मूळ संरचनेत आल्यास बूथ लेव्हलवर पक्ष अधिक शक्तिशाली होईल.

९. लढाऊ कार्यकर्त्यांची टीम: निवडणुकीच्या काळात केवळ प्रचार करून चालत नाही, तर मोर्चे आणि आंदोलने हाताळावी लागतात. प्रहारचे कार्यकर्ते अॅक्शन मोड मध्ये राहण्यासाठी ओळखले जातात, जे शिवसेनेसाठी फिल्डवर मोठी ताकद ठरेल.

१०. बच्चू कडू यांची प्रतिमा एक साधा पण लढाऊ नेता अशी आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला केवळ राजकीयच नाही, तर एक नैतिक बळही मिळेल जेणेकरून ते भाजप आणि काँग्रेसला विदर्भात मोठी टक्कर देऊ शकतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चिमुकलीचे भाषण ऐकून सचिन तेंडुलकरही भारावला, कौतुक करत म्हणाला…
  • UAE OPEC : यूएईच्या निर्णयाने तेल विश्वात उडाली मोठी खळबळ, पण येणाऱ्या दिवसात भारताचा होणार डबल फायदा
  • गगनचुंबी इमारतीत किंचाळ्या घुमल्या, पॉश गौर ग्रीन अव्हेन्यू सोसायटीत बघता बघता भयंकर आग; अनेक मजले धडाधड पेटले
  • ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं 5 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक
  • Sanjay Raut | पश्चिम बंगाल निवडणुकीवरून राजकारण तापलं; ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे केंद्रसरकारवर गंभीर आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in