
नुकताच मोठी माहिती पुढे येतंय. पारादीप बंदरातून लोहखनिज घेऊन जाणारे एक परदेशी जहाज खोल समुद्रात बेपत्ता झाले. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, पनामाचा ध्वज असलेले एक मालवाहू जहाज ओडिसाच्या किनाऱ्याहून निघाले. यादरम्यान 240 सागरी मैल अंतरावर बंगालच्या उपसागरात हे मोठे जहाज बुडाले. ज्यावेळी हे जहाज बुडाले, त्यावेळी जहाजावर नक्की किती लोक होते. याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. मात्र, जहाजावरील कर्मचाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली जातंय. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बचाव मोहीम सुरू केली आहे. यामध्ये जे बचावलेले कर्मचारी आहेत, ते जास्त करून चिनी आहेत.
या जहाजावर नक्की किती कर्मचारी होते, याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. यासोबतच बचावकार्यात मदत करण्यासाठी इतर जहाजांचीही मदत घेण्यात आली. इंडियन कोस्ट गार्डच्या पारादीप युनिटचे उपमहानिरीक्षक संजय नेगी यांनी या अपघाताबद्दल म्हटले की, अंदमान आणि निकोबार युनिटद्वारे शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. बचावकार्य थोड्यावेळात पोहोचतील.
आम्ही जहाज शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांची सुटका करण्याठी प्रयत्न करत आहोत. आम्ही आसपासच्या जहाजांना देखील अलर्ट जारी केला. सध्या जहाजाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही जहाज नक्की का बुडाले याबाबत माहिती मिळू शकली नाही. जहाजावर 20 चिनी नागरिक होते. दोघे म्यानमारचे आणि एक जण बांगलादेशचा नागरिक असल्याची माहिती आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत काही माहिती मिळू शकली नाही. मिळालेली अधिकची माहिती अशी की, पनामाचा ध्वज असलेले जहाज 1,700 टन लोहखनिजाचा चुरा घेऊन 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पारादीपहून निघाले होते. 200 नॉटिकल मैल पार केल्यानंतर या जहाजाचा संपर्क तुटला. मात्र, नक्की काय झाले, याबाबत माहिती अजून मिळू शकली नाही. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली. अजूनही जहाजाचा शोध सुरू आहे. कर्मचाऱ्यांबाबतही चिंता व्यक्त केली जातं.
Leave a Reply