• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक OTT वर येताच ठरला हिट, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

August 17, 2026 by admin Leave a Comment


ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे आजकाल एखादा चित्रपट थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही, तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याला नव्याने प्रेक्षक मिळताना दिसतात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर आता कंगना रनौतच्या एका चित्रपटाबाबतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कंगनाच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाने थिएटरमध्ये फारशी कमाई केली नसली तरी ओटीटीवर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट 14 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. चित्रपटाची भारतातील कमाई सुमारे 6.67 कोटी रुपये तर जगभरातील कमाई जवळपास 8.16 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. समीक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही.

ओटीटीवर फ्लॉप चित्रपट ठरला हिट

मात्र आता ओटीटीवर चित्रपटाचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळत आहे. 14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर ‘भारत भाग्य विधाता’ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि तो ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

‘भारत भाग्य विधाता’ची कथा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात सरकारी रुग्णालयातील नर्सेस संकटाच्या काळात दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधान अधोरेखित करण्यात आलं आहे. दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता लहान मुलांसह अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतात हे चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. कंगना रनौतने यात प्रमुख भूमिका साकारली आहे.

कंगनाचा आगामी चित्रपट कोणता?

थिएटरमध्ये अपयशी ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याने ‘भारत भाग्य विधाता’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकदा थिएटरमध्ये प्रेक्षक न मिळालेल्या चित्रपटांना डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नवा प्रेक्षकवर्ग मिळतो. कंगनाच्या या चित्रपटाबाबतही सध्या असंच चित्र दिसत आहे.

दरम्यान, कंगना रनौतच्या आगामी प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. माहितीनुसार, ती ‘सर्कल’ आणि ‘क्वीन 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘क्वीन 2’ हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘क्वीन’ या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे. त्यामुळे कंगनाच्या आगामी चित्रपटांकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in