• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फॉर्च्युनरला विसराल,टोयोटा भारतात आणणार सर्वात स्वस्त Land Cruiser

August 15, 2026 by admin Leave a Comment


भारतीय बाजारात सुव्ह कारची मागणी मोठी आहे. टोयोटा कंपनी आता लवकरच एक स्वस्तातील दमदार सुव्ह कार बाजारात आणत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये प्रदर्शित झलेली टोयोटा लँड क्रुझर एफजे भारतात लाँच होणार आहे. ही सर्वात स्वस्त लँड क्रुझर ठरणार आहे. यात दमदार फिचर्स असून या कारला भारतात मॅन्युफॅक्चर करण्याची योजना आहे. चला या कारची माहिती जाणून घेऊयात..

भारतात टोयोटा कंपनी या Toyota Land Cruiser FJ ला साल २०२८ पर्यंत लाँच करु शकते. म्हणजे या कारच्या लाँचिंगला अजून वेळ आहे. ही कार भारतात फॉर्च्युनर हून कमी किंमतीत येणार आहे. तसेच ही सर्वात स्वस्त लँड क्रुझर ठरणार आहे. कंपनीने या कारला साल २०२५ मध्ये जपान मोबिलिटी शोमध्ये प्रदर्शित केले होते.

किंमत कमी राखण्यासाठी योजना

टोयोटा या कारला भारतात केवळ लाँच करणार नाही तर या कारचे निर्मिती देखील भारतात करण्याच्या तयारीत आहे. या कारची किंमत कमी राखण्यासाठी त्यामुळे मदत मिळणार आहे. टोयोटाने या कारची वर्षाला ८९ हजार युनिट्स तयार करण्याची योजना आखली आहे. यातील ४० हजार युनिट्सना मध्य पूर्वेत निर्यात केले जाणार आहे.

टोयोटा लँड क्रुझ एफजे भारतात ३० लाख रुपयांच्या बजेटमध्ये लाँच करु शकते. या कारची किंमत कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकलाईज करण्यावर फोकस करत आहेत. भारतात याचा थेट मुकाबला महिंद्र स्कॉर्पिओ एन 4×4 आणि फोर्स गोरखा सारख्य कारशी होणार आहे.

Land Cruiser FJ काय आहे खास?

लँड क्रुझर एफजे टोयोटा आयएमव्ही लँडर फ्रेम प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.यात २.७ लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन १६३ पीएस पॉवर आणि २४६ एनएमच टॉर्क प्रोड्युस करतो. यात ६ स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स मिळू शकतो.ही कार ४ व्हील ड्राईव्ह सिस्टीमसह येणार आहे.

ही एसयुव्ही ४५७४ एमएम लांबी, १८५५ एमएम रुंद, १९६० एमएम उंच आणि २५८० एमएमच्या व्हील बेस सह येणार आहे.यात २१५ एमएमचा ग्राऊंड क्लिअरन्स मिळणार आहे. याचा अर्थ ही सुव्ह फॉर्च्युनर कार पेक्षा लहान असेलच शिवाय महिंद्र स्कॉर्पिओ एन पेक्षाही कमी लांबीची असणार आहे.

या कारमध्ये एलईडी डेडलाईट्स असेल, जे एलईडी डीआरएल्ससोबत असेल. यात रुफ रेल्स, साईड स्टेप्स आणि स्कॉयर व्हील आर्च मिळेल. या शिवाय सिग्नेचर टेलगेट माऊंटेड स्पेअर व्हील सोबत साईड ओपनिंग गेट मिळेल. एसयुव्ही ५ सिटर अवतारात मिळणार आहे. यात १२.५ इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सनरूफ, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फिचर्स देखील मिळतील.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in