• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 2 मिनिटं उशीर झाला असता तर टीम इंडियाच्या हातून गेला असता गॉल कसोटी सामना, कारण की…

August 19, 2026 by admin Leave a Comment


India vs Sri Lanka, Galle Test: गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला 165 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताची पहिल्या डावापासून पकड राहिली होती. त्यामुळे भारतीय संघ विजयी होणार हे पक्कं झालं होतं. पण या कसोटी सामन्यात 2 मिनिटं उशीर झाला असता तर चित्र काही वेगळं असतं. 2 मिनिटात असं काय घडलं असतं की हा भारताच्या हातून हा सामना गेला असता, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 2 मिनिटं आणि गॉल कसोटी सामन्याचं कनेक्शन काय आहे? भारताने 600व्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला, हे त्या दोन मिनिटांच्या फरकाने हा सामना गमवणं कसं काय शक्य झालं असतं? चला जाणून घेऊयात त्याबाबत…

2 मिनिटं उशीर झाला असता तर..

भारतीय संघाला दोन मिनिटं उशीर आणि सामना विजयाचं गणित काय आहे? त्याचं उत्तर सामना संपल्या संपल्या मिळालं. भारताने गॉल कसोटी सामन्यात विजय मिळवला आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली. जर भारताने शेवटची विकेट घेण्यास दोन मिनिटं उशीर केला असता तर गॉल सामना पावसामुळे थांबवावा लागला असता. त्यात पाऊस थांबला नसता तर उर्वरित खेळच झाला नसता. त्यामुळे हातातोंडाशी आलेला सामना हातून गेला असता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ड्रॉ करण्याची वेळ आली असती. इतकंच काय तर सामन्यानंतर होणारं प्रेजेन्टेशन आत करावं लागलं. हा सामना सुरू असताना दुसऱ्या दिवशी पावसामुळे मोठा खंड पडला होता. त्यामुळे हा सामना ड्रॉ होतो की काय? असा विचार क्रीडाप्रेमी करत होते.

काय झालं या सामन्यात?

भारताने पहिल्या डावात 178 धावांची आघाडी घेतल्याने फायदा झाला. त्यात दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि 371 धावा झाल्या. त्यामुळे 372 धावांचं मोठं लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवलं. श्रीलंकेने या धावांचा पाठलाग करताना 206 धावा केल्या आणि डाव आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि सोनल दिनुषा यांनी चिवट खेळी केली. दोघांनी अर्धशतकं ठोकली, पण संघाला विजयाच्या वेशीवर पोहोचवू शकले नाहीत. त्यात मानव सुथार फिरकीमुळे श्रीलंकन संघ अडचणीत आला होता. त्याने दोन्ही डावात मिळून 10 विकेट घेतल्या. देवदत्त पडिक्कलने शतकासह 211 धावा केल्या. त्यामुळे प्लेयर ऑफ द मॅच निवडलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in