• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेता पत्नीला हातसुद्धा लावत नाही, पण इतर मुलींसोबत नको ते कृत्य; प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा शॉकिंग खुलासा

August 7, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या आयुष्यात नाती कॅमेऱ्यासमोर दिसतात, तशीच तर बिलकूल नसतात. पडद्यावर परफेक्ट कपल आणि आयडॉल दिसणारे नाती खऱ्या आयुष्यात मात्र अनेक चढ – उतारांचा सामना करत असतात. पण या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसतो… आता देखील अशाच एका कपलचा खुलासा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी हिने केला आहे. सांगायचं झालं तर, ‘ट्रेटर्स 2’ मध्ये तान्या पुरी दिसणार आहे. एका पॉडकास्टमध्ये तान्या हिने इंडस्ट्रीतील एका टॉप अभिनेत्याबद्दल मोठा खुलासा केसा आहे.. ज्याने अनेक वर्षांपासून पत्नीला हातसुद्धा लावला नाही, पण इतर मुलींसोबत नको ते कृत्य करायचा…

तान्या म्हणाली, ‘सध्या मी ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहे, तो अभिनेता एक ग्रीन फॉरेस्ट आणि ग्रीन फ्लॅग आहे… तो लोकांच्या नजरेत एक आयडॉल आहे… तिची ओळख परफेक्ट रिलेशनशिप, मुलांचा चांगला वडील असा आहे… तो एक चांगला बाप तर आहेच, पण त्याची बायको माझ्याकडे आलेली. तिला तिच्या नवऱ्याबद्दल माहिती मिळवायची होती, कारण आयुष्यात काही तरी मागे राहत आहे, असं तिला वाटत होता… तिला निर्णय घ्यायचा होता, कायम तिच्या नवऱ्याबद्दल रंगणाऱ्या चर्चा तिच्या कानावर आलेल्या.’

‘अखेर आम्हाला कळलं की, तो एका सिनेमासाठी काम करत आहे. जेथे त्यांच्या कमी वयाच्या मुलींशी संपर्कात आला. त्याचे तरुणींसोबत संबंध होते, पण बायकोसोबत तो फक्त नवरा म्हणून होता. त्या अभिनेत्याच्या बायकोने आम्हाला सांगितलेलं की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध आले नाहीत. ते एक खोलीत देखील झोपत नाही. दोघे त्यांच्या एक – एक मुलांची काळजी घेतात…’

तान्या पुढे म्हणाली, ‘दोघे आजही एकमेकांसोबत पती – पत्नी म्हणून राहत आहेत. तिला तिच्या नवऱ्याच्या सर्व कृत्यांबद्दल माहिती आहे. पण सेलिब्रिटींसोबत लग्न मोडणं फार कठीण असतं. कारण त्यांच्या लोकप्रियतेला ठेच पोहचू शकते… तान्या हिने पॉडकास्टमध्ये अभिनेत्याचं नाव जाहिर केलं नाही. पण सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in