• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रदर्शनापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या चित्रपटाची कोट्यवधींची कमाई; रजनीकांत यांचाही रेकॉर्ड मोडणार?

July 20, 2026 by admin Leave a Comment


तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा करत होता. अखेर काही कट्स सुचवल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर आता एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजेच 23 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. थलपती विजय यांच्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्यानंतर विजय यांनी चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

‘जन नायकन’ या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली असून प्रेक्षकांमध्ये याविषयी प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी 19 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भारतात विकल्या गेलेल्या तिकिटांमधून या चित्रपटाने तब्बल 6.7 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ भाषेत 1,33,904 तिकिटं विकली गेली असून त्यातून 3.86 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. कर्नाटकमध्ये या चित्रपटाने 2.59 कोटी रुपये, तर तमिळनाडूमध्ये 2.47 कोटी रुपये आणि केरळमध्ये 1.32 कोटी रुपये कमावले आहेत. गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

रजनीकांत यांचा विक्रम मोडणार का?

थलपती विजय यांचा ‘जन नायकन’ हा चित्रपट रजनीकांत यांच्या ‘कुली’चा विक्रम मोडू शकणार का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 151 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. एखाद्या तमिळ चित्रपटाने इतकी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याआधी विजय यांच्याच ‘लियो’ या चित्रपटाने 148.5 कोटी रुपयांनी बंपर ओपनिंग केली होती. ‘जन नायकन’ या चित्रपटात विजय यांच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम मेनन, प्रकाश राज, प्रियामणी यांच्या भूमिका आहेत.

सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देताना या चित्रपटात एकूण 12 कट्स सुचवल्याचंही कळतंय. सेन्सॉर बोर्डाने ‘जन नायकन’ला ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. हा चित्रपट एकूण 183 मिनिटं म्हणजेच 3 तास 3 मिनिटं आणि 11 सेकंदांचा आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर जवळपास 20 सेकंदांचा फुटेजसुद्धा काढून टाकण्यात आला आहे. त्याजागी जवळपास दहा सेकंदांचे नवे सीन्स जोडण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in