
मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे हा गोंधळ फक्त एका शहरापुरताच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा गोंंधळ उडाल्याचे समोर आले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातही ऑनलाईन परीक्षेत गडबड झाल्याने सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी आता परीक्षेच्या ठिकाणीच आंदोलनाची हाक दिली आहे. जोपर्यंत ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं दीपके यांनी सांगून टाकलंय. दरम्यान, ही भूमिका घेण्याआधी दीपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची अडचण जाणून घेतली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी दीपके यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. एक विद्यार्थी तर चक्क भावूक झाला. दीपके यांच्यापुढे बोलताना त्याचा कंठ दाटून आल्याचे दिसले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply